पणजी: नेपाळी नागरिकांची नावे पणजीतील मतदारयादीत घुसडविली जातील अशी भीती उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केली होती. आता एका नेपाळी नागरिकाने पर्वरीतील पत्त्यावर पॅनकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आणि आधारकार्ड मिळविल्याची माहिती ‘गोमन्तक’च्या हाती लागली आहे.
चालवताना नियमभंग केल्याने वाहतूक पोलिसांनी कैलाश सिंह कार्की या नेपाळी नागरिकाला पकडले. त्यावेळी तपासणी करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे तो नेपाळी असल्याचे स्पष्ट झाले.
त्याच्याकडे नेपाळ सरकारचे ५११५११०२९३ या क्रमांकाचे राष्ट्रीय ओळखपत्र असतानाही जीए ०३ २०२३०००६०१५ या क्रमांकाचा वाहन चालवण्याचा परवाना, एमएसपीपीके ९३०९डी या क्रमांकाचे पॅनकार्ड व ७३८५१२४९५८६६ या क्रमांकाचे आधारकार्ड आढळले.
सरकारी कागदपत्रांत पत्ता नोंदविताना घराचा क्रमांक, इमारत क्रमांक नोंद करावा लागतो. या पठ्ठ्याने तशी काही माहिती न देताच ‘द्वारा दीपेंद्रसिंह कार्की, सुकूर पंचायत, सुकूर, पर्वरी-बार्देश, गोवा’ या पत्त्यावर ही कागदपत्रे मिळविली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.