Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : गोव्यात साडेतीन हजार ‘नीट’ परीक्षार्थी ; राज्यात चार केंद्रे

Goa News : गोव्यासह विविध राज्यांतील ५७१ केंद्रांसह विदेशात स्थापन केलेल्या १४ केंद्रांतून ही परीक्षा घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

विजय देसाई

Goa News :

कुंकळ्ळी, वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यासाठी गरजेची तसेच भावी डॉक्टर घडविण्याची पहिली पायरी असलेली नीट (नॅशनल एंटरन्स कम एलिजिबिलीटी टेस्ट) म्हणजे राष्ट्रीय प्रवेश व पात्रता परीक्षा रविवारी संपूर्ण भारतासह गोव्यात आणि विदेशातील केंद्रांमध्ये घेण्यात आली. देशभरातून २४ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. गोव्यातून सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट’ची परीक्षा दिली.

गोव्यात मुरगाव, पणजी, फोंडा, कुंकळ्ळी येथील विविध केंद्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. एनटीए (नॅशनल टेस्टिंग ऑथॉरिटी) राष्ट्रीय चाचणी अधिकारिणीच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली. गोव्यासह विविध राज्यांतील ५७१ केंद्रांसह विदेशात स्थापन केलेल्या १४ केंद्रांतून ही परीक्षा घेतली. दक्षिण

गोव्यातील कुंकळ्ळी एनआयटी केंद्रातून ३६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. रविवारी सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती.

७२० गुणांची परीक्षा : नीट परीक्षेत एकूण ७२० गुण असतात. बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. योग्य पर्यायाभोवती गोल करावे लागते. जीवशास्त्र विषयात ३६० गुण, रसायनशास्त्र १८० व भौतिकशास्त्र १८० अशी गुण विभागणी केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Agniveer Job News: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा दिलासा! 4 वर्षांचा कार्यकाळ संपताच हातात असणार दुसरी सरकारी नोकरी; काय आहे नेमका प्लॅन?

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीचा गुंता सुटणार? रविवारी तज्ज्ञांची पाहणी; सोमवारी संयुक्त बैठकीत मोठा निर्णय

Horoscope 18 September 2026: शुक्रवारचा ग्रहांचा महासंयोग! 5 राशींना होणार अफाट आर्थिक फायदा; रखडलेली कामे चुटकीसरशी मार्गी लागणार

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

SCROLL FOR NEXT