Anmod Ghat Accident Death Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat Accident: ..आणि क्षणार्धात सगळं संपलं! घाटात दुचाकीचा ताबा सुटला, गोव्यात नोकरी करणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

Anmod Ghat Bike Accident Death: रामनगर-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटात दुचाकी अपघाताची गंभीर घटना घडून जोयडा तालुक्यातील कुरवई येथील २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Sameer Panditrao

रामनगर-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटात दुचाकी अपघाताची गंभीर घटना घडून जोयडा तालुक्यातील कुरवई येथील २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सचिन सावर्डेकर असे मृताचे नाव असून, या अपघातात अमर ठाकूर (रा. सोनारवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास अनमोड घाटातील आरटीओ तपासणी नाक्याजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, सचिन आणि अमर हे दोघे दुचाकीवरून गोव्याच्या दिशेने प्रवास करत होते. घाटातील वळणदार आणि उताराच्या रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्ता दुभाजकाला जाऊन जोरदार धडकले.

धडक इतकी भीषण होती की दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारे रामनगर येथील रुग्णालयात दाखल केले. सचिन सावर्डेकर याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला बेळगाव येथील उच्च उपचारासाठी पाठवण्याचा सल्ला दिला.

मात्र बेळगावकडे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. जखमी अमर ठाकूर याच्यावर रामनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मृत सचिन सावर्डेकर हा गोव्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत होता.

त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुरवई आणि परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. रामनगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेत पुढील तपास सुरू केला असून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT