Nagpur-Goa Expressway: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-गोवा महामार्गाचं काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. राज्य रस्ते विकास महामंडळानं या महामार्गाच्या डीपीआरसाठी निविदा मागवल्या आहेत. या महामार्गाचे नाव 'महाराष्ट्र शक्तीपीठ एक्स्प्रेसवे' ठेवण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील 12 जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गासाठी 75 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे नागपूर–गोवा अंतर फक्त आठ तासांत पार करता येणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या अतंर्गत नागपूर – गोवा महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार आहे तर सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपणार आहे. वर्धा येथून हा मार्ग समृद्धी महामार्गाद्वारे नागपूरला जोडण्यात येणार आहे. हा महामार्ग १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. एकूणच हा मार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून जाणार आहे.
आजघडीला रस्ते मार्गे नागपूर – गोवा अंतर कापण्यासाठी 21 ते 22 तास लागतात. हे अंतर 1000 किमीहून अधिक आहे. हा महामार्ग झाल्यानंतर हे अंतर 760 किमी होणार आहे. तसेच लोकांना कमी वेळेत प्रवास करता येणार आहे असे एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नी या महामार्गाची घोषणा केली होती. या महामार्गाचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे
धार्मिक स्थळांना जोडणारा महामार्ग
नागपूर–गोवा महामार्गाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा मार्ग राज्यातील अनेक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका माता, सेवाग्राम आश्रम, औंढा नागनाथ, नांदेड गुरुद्वारा, परळी-वैजनाथ, पंढरपूर, तुळजाभवानी, महालक्ष्मी आणि पत्रादेवी या धार्मिकस्थळांना हा मार्ग जोडला जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.