18 year old girl suspicious death in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

18 Year Old Girl Found Dead Goa: उत्तर गोव्यातील नास्नोळा येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

पणजी: उत्तर गोव्यातील नास्नोळा येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. येथील एका 18 वर्षीय तरुणीचा तिच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी तिच्या खोलीत बराच वेळ काहीही हालचाल न करता बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचे तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून म्हापसा पोलीस ठाण्याचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन प्राथमिक तपास सुरु केला. तसेच, मृत्यूचे नेमके कारण आणि संशयास्पद बाबींचा सखोल शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. टीमने तात्काळ खोलीतून आवश्यक ते पुरावे गोळा केले.

तरुणीच्या या अचानक आणि संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस सध्या तिच्या कुटुंबीयांची आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आहेत. हा घातपाताचा प्रकार आहे की अन्य काही, याचा अचूक छडा लावण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. म्हापसा (Mapusa) पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT