Goa Forward Party Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party: राज्‍य हिताविरोधातील निर्णयांना विरोध करण्याची CM मध्ये धमक नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forward Party मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे तेथील कोळशाचे प्रमाण हळूहळू कमी करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. परंतु आश्‍‍वासनपूर्ती सोडाच, उलट कोळसा हाताळणीमध्ये तीनपटीने वाढ करून त्यांनी घूमजाव केले आहे.

गोमंतकीयांची फसवणूक केली आहे. या बंदरात ७ मेट्रिक टन कोळसा हाताळणीवरून १९.५ मेट्रिक टन कोळसा हाताळणीसाठी आवश्‍यक परवानेही देण्यात आलेले आहेत. हे परवाने सरकारने त्वरित मागे घ्‍यावेत, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे.

पणजीतील पक्षकार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत बोलताना पर्यावरण कक्षाचे समन्वयक विकास भगत म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी केंद्राने लादलेले निर्णय निमूटपणे स्वीकारत आहेत.

राज्‍याच्‍या हिताविरोधात लादण्यात येणाऱ्या निर्णयांना विरोध करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांची असायला हवी. प्रदूषणापासून गोवा वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विरोध करायला हवा. मात्र ते आपली खुर्ची वाचविण्याच्‍या नादात लोकांना खोटी आश्‍वासने देऊन फसवणूक करत आहेत.

गोव्यात कोळसा नको असे केंद्राला ठणकावून सांगण्‍याची धमक मुख्‍यमंत्री सावंत यांच्‍यामध्‍ये नाही. त्यामुळेच केंद्राचे निर्णय स्वीकारण्याशिवाय मुख्यमंत्र्यांकडे पर्याय नाही, असा टोला भगत यांनी लगावला.

कोळसा हाताळणीचे विपरित परिणाम मुरगाव तालुक्‍यातील लोकांच्‍या जीवनावर होऊ लागले आहेत. अनेक आजारांचा त्‍यांना सामना करावा लागतोय.

या संकटातून त्‍यांना सोडविण्‍यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. परंतु मुख्‍यमंत्री स्‍वत:च्‍या स्‍वार्थासाठी गोमंतकीय जनतेचा बळी द्यायला निघाले आहेत, असा सनसनाटी आरोपही भगत यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT