Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'त्‍या' व्‍यावसायिकाला विषारी द्रव पाजल्याचा संशय; सलायम मृत्युप्रकरणी 'त्या' महिलेचा पोलिसांकडून कर्नाटकात शोध

Sandeep Salim Murder Case: कर्नाटक राज्यातील उडुपी येथील जलक्रीडा व्यावसायिक आणि एका माजी मंत्र्यांचे माजी वाहनचालक संदीप सलायम (वय ४० वर्षे) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण आले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: कर्नाटक राज्यातील उडुपी येथील जलक्रीडा व्यावसायिक आणि एका माजी मंत्र्यांचे माजी वाहनचालक संदीप सलायम (वय ४० वर्षे) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण आले आहे. प्राथमिक तपासाअंती कळंगुट पोलिसांनी या प्रकरणात थेट खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संदीप यांना मृत्यूपूर्वी तोंडातून गुंगीचे किंवा विषारी द्रव्य प्राशन करायला लावल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेली एक महिला अक्षता ऊर्फ रूपाश्री सध्या पोलिसांच्या रडारवर असून, तिच्या शोधासाठी कळंगुट पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले आहे. तिथे तिचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संदीप हे त्यांचे नातेवाईक आणि मित्रांसह गोव्यात पर्यटनासाठी आले होते.

२९ जूनच्या रात्री या गटाने पणजीतील एका कॅसिनोला भेट दिली. तिथेच या अज्ञात महिलेने त्यांच्याशी मैत्री केली. संशयित महिला अक्षता उर्फ ​​रूपाश्री हिने संदीप यांना हॉटेलच्या खोलीत नेऊन गुंगी आणणारा किंवा मादक पदार्थ पाजला. त्यामुळे संदीप बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

महिलेची ओळख पटली; पण...

बुधवारी झालेल्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना अमली किंवा विषारी पदार्थ पाजल्याचा संशय बळावला आहे. डॉक्टरांना मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करता न आल्याने त्यांनी व्हिसेरा राखून ठेवला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.

सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या महिलेची ओळख पटवली आहे. या संशयित महिलेच्या अटकेनंतर आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच या हाय-प्रोफाईल मृत्यूमागील गूढ उकलण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT