Calangute Crime News: कळंगुटमध्ये क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणाच्या एकाला अटक तर पीडित महिलेची सुटका

Prostitution Racket Busted In Calangute: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कळंगुट परिसरात पोलिसांनी मानवी तस्करीविरोधी एक मोठी मोहीम राबवून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला.
Prostitution Racket Busted In Calangute
Goa crime branch busts sex racket in Calanguteai generated images
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कळंगुट परिसरात पोलिसांनी मानवी तस्करीविरोधी एक मोठी मोहीम राबवून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी एका महिलेची या नरकयातनेतून सुरक्षित सुटका केली असून, तिला या व्यवसायात ढकलणाऱ्या 33 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा मूळचा तेलंगणातील रहिवासी असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट येथील पामिर्ना रिसॉर्टच्या जवळ गोवा पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. संशयित आरोपी हा एका स्कूटरवरुन पीडित महिलेला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला मधेच गाठले आणि अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. व्यावसायिक नफा कमवण्याच्या उद्देशाने या महिलेचे (Women) लैंगिक शोषण केले जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. पोलिसांनी या कारवाईत गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली स्कूटर आणि इतर काही साहित्य जप्त केले.

Prostitution Racket Busted In Calangute
Goa Crime: कळंगुट रिसॉर्टमध्ये कर्नाटकातील व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू; खुनाचा संशय, कॅसिनोत ओळख झालेली 'ती' महिला बेपत्ता

या खळबळजनक प्रकरणाची गंभीर दखल घेत क्राईम ब्रँचने संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (ITPA) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेला सुरक्षित स्थानी पाठवण्यात आले असून, तिला योग्य समुपदेशन दिले जात आहे. गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली या रॅकेटची पाळेमुळे कुठेपर्यंत पसरलेली आहेत, तसेच यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल आणि पुढील तपास क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Suspicious Death
Vagator Beach Hostel Drug Racket
Goa Crime Branch Illegal Immigrant
Goa Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com