Samir Shaikh Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: मृतदेह पूर्णत: कुजलेला, समीर शेखच्या पोस्टमार्टममधून काहीच लागले नाही हाती; खून प्रकरणाचा तिढा वाढला

Goa Crime News: समीरच्या शवविच्छेदनातून त्याच्या मृत्यूचे कारण समोर येणे अपेक्षित होते पण, त्याचा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने अहवालातून त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

Pramod Yadav

सावर्डे: गुड्डेमळ येथील ३२ वर्षीय समीर शेखचा गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या खुनाचा तिढा अधिक वाढला आहे. शवविच्छेदन अहवालातून शेखच्या खुनाचे कारण समोर येणे अपेक्षित होते. पण, मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने पोस्टमार्टममध्ये मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. यामुळे आता पोलिसांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

पुण्यात एका सामाजिक संस्थेसाठी काम करणारा समीर २५ मे रोजी ईदसाठी तो गोव्यात मूळ गावी गुड्डेमळ येथे आला होता. मित्राने ईं-मेल करुन दिल्लीला बोलावल्याने ३० मे रोजी समीर दिल्लीला गेला.

पण, दिल्लीतून तो गाझियाबाद – उत्तर प्रदेश येथे गेला आणि तिथेच त्याचा खून करण्यात आला. दहा ते बारा दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला. चादर आणि चटईत गुंडाळून बाथरुममध्ये ठेवल्याने समीरचा मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता.

समीरच्या शवविच्छेदनातून त्याच्या मृत्यूचे कारण समोर येणे अपेक्षित होते पण, त्याचा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने अहवालातून त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. व्हिसेरातून देखील काही हाती न लागल्याने आता पोलिसांसमोरील पेच वाढला आहे.

समीर शेख पार्टीसाठी गाझियाबादमध्ये आला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. येथेच त्याचा खून केला असावा असा अंदाज बांधला जात आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर, दोन संशयित अद्याप फरार आहेत.

समीर दिल्लीत आल्यानंतर त्याच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कुडचडे पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. कुडचडे पोलिस याप्रकरणाचा तपास करत होते.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या खुनाच्या माहितीनंतर कुडचडे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले आहे. समीर शेखचा खून का करण्यात आला? तसेच, दिल्लीतून तो गाझियाबाद येथे खरचं पार्टीसाठी गेला होता का आणखी काही? याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सात जणांना गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात

Kerala Cricket League: 10 चौकार, 18 षटकार! संजू सॅमसनलाही सोडले मागे, केरळ क्रिकेट लीगमध्ये विष्णू विनोदचे 'तूफान'

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

SCROLL FOR NEXT