Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: समाजमाध्यमांतून संतप्‍त प्रतिक्रिया; 'या प्रकरणाला सरकारच दोषी'

पोलिसांनी हे प्रकरण सुरुवातीपासून योग्य प्रकारे हाताळले नाही; पोलिस आणि डॉक्‍टर टार्गेटवर

दैनिक गोमन्तक

पणजी: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र अवस्थेत मृत सापडलेल्या सिद्धी नाईक आणि तिच्‍या कुटुंबाला न्‍याय मिळावा यासाठी आता ‘जस्टीस फॉर सिद्धी नाईक’ ही मोहीम राबविली जात असून, समाजमाध्यमांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सुरवातीपासूनच पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्‍थित होत असल्याने पोलिस आणि डॉक्टर आता टार्गेट होत आहेत.

पोलिसांसोबतच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक विभागानेही या प्रकरणी कमालीचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याचा स्पष्ट झाल्याने यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. घटना घडून बारा दिवस होत आले तरी सिद्धीचे कपडे आणि इतर साहित्य अद्याप सापडलेले नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास यंत्रणेवर नेटकरी आक्रमकपणे बोलत आहेत. पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांच्या हाती अद्याप काही लागलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा सिद्धीचा मोबाईल, मित्र आणि नातेवाईकांकडे वळवला आहे.

डॉक्टरांनी सिद्धीचा तपासासाठी लागणारा अत्यंत महत्त्वाचे व्हिसेरा आणि इतर स्वॅब काढलेले नाहीत. त्यामुळे एका अर्थाने न्यायवैद्यक विभागाच्या अहवालाच्या आधारे केल्या जाणाऱ्या तपासासाठीची दारे सध्यातरी बंद झाली आहेत. त्यामुळे डॉक्टरांचा हा प्रचंड हलगर्जीपणा स्पष्ट होत आहे. यावरही सोशल मीडियावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. समाजमाध्यमांवरील काही चॅनल्स, युट्युब, ट्विटर यांनीही हा विषय सध्या तरी न्यायाच्या प्रतीक्षेत ठेवलेला दिसतो.

व्यक्त होऊ लागलेल्या तिखट प्रतिक्रिया...

  1. स्नेहा लोटलीकर यांनी प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्या करताना काळजी घ्यावी असे म्हटले आहे.

  2. सामाजिक कार्यकर्त्या विणा नाईक यांनी म्हटले आहे की, अशाप्रकारचा तपास चालू असताना प्रसारमाध्यमांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी. या प्रकरणामध्ये पोलिस दोषी असल्याचे म्हटले आहे.

  3. शिवसेनेचे गोवा अध्यक्ष जितेश नाईक यांनी राज्यात वाढणारी गुन्हेगारी रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

  4. काँग्रेसच्या नेत्या बिना नाईक त्यांनीही हे प्रकरण योग्यप्रकारे पोलिस हाताळत नसल्याचं आणि पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  5. ‘चायपाणी’ या सामाजिक माध्यमातील चॅनलच्या श्रुती चतुर्वेदी यांनी गोव्यातल्या महिलांवर अत्याचार वाढत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली असून, महिलांवरील अत्याचार रोखणे मध्ये पोलीस यंत्रणा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणे मध्ये सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणाला पूर्णपणे सरकारच दोषी आहे. राज्‍यात महिला सुरक्षित नसल्‍याचे पुन्‍हा एकदा सिद्ध आहे. पोलिस निष्‍काळजी राहिल्यानेच त्‍यांनी हे प्रकरण योग्‍य प्रकारे हाताळलेच नाही.

- प्रतिमा कुतिन्हो, आपच्‍या नेत्‍या

महिलांवर मोठ्या प्रमाणात सातत्याने अन्याय होत आहे. यापूर्वीही तरूणींवर बलात्कार करून खून केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांसाठी राजकीय व्यक्ती, पोलिस दोषी आहेत.

- आवडा व्‍हिएगस, सामाजिक कार्यकर्त्या.

पोलिसांनी हे प्रकरण सुरुवातीपासून योग्य प्रकारे हाताळले नाही. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांत पोलिस तपास ‘जैसे थे’ आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस यंत्रणा कमी पडली आहे.

- तारा केरकर, सामाजिक कार्यकर्त्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT