Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: पीर्ण येथील हत्येचं गूढ 15 तासांत उलगडलं, मुख्य आरोपीला अटक; साथीदारांचा शोध सुरू

Goa Crime: पीर्ण परिसरात शुक्रवारी सकाळी उघड्या पठारावर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Sameer Amunekar

म्हापसा: पीर्ण परिसरात शुक्रवारी सकाळी उघड्या पठारावर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत्यू हा मारहानीतून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी अखेर आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख कपिल चौधरी (वय १९, रा. पिरणा) अशी पटली आहे. या प्रकरणात कांदोळी येथील गुरुदत लवांडे (वय ३१) याला अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान उघड झाले की कपिलने काही दिवसांपूर्वी गुरुदतकडून कार भाड्याने घेतली होती. मात्र, नंतर कार गोवा सीमेबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुदतने ती कार शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

त्यानंतर गुरुदत आणि त्याच्या मित्रांनी कपिलचा मागोवा घेत महाराष्ट्रात जाऊन त्याला पकडले आणि थिवि येथे परत आणले. तेथे त्यांनी कपिलवर मुठी, लाथा आणि लाकडी काठीने मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला एका डोंगराळ भागात सोडून दिले. काही तासांनंतर कपिलचा मृतदेह सापडला.

गुरुदत लवांडेने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे इतर साथीदार अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक वेगाने काम करत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीआय कोलवाले संजित कांदोळकर आणि एसडीपीओ मापुसा विल्सन डिसोझा यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT