Goa Crime: मदतीच्या बहाण्याने लैंगिक अत्याचाराचा आरोप, तक्रारदाराकडून जबाबास नकार; आरोपीची निर्दोष सुटका

Goa Crime News: आरोपीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांनी सुनावला.
Goa Accident Case 2016
Goa Court JudgementDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्य साक्षीदार तथा तक्रारदार महिलेने न्यायालयात जबाब देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीस संशयाचा लाभ देत पणजी येथील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाने (पॉक्सो) कार्ल हेंड्रिक्स (वय ३८) यांना निर्दोष मुक्त केले आहे.

आरोपीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांनी सुनावला. महिलेचा जबाब उपलब्ध नसल्याने आणि सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे व विसंगत असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

ही घटना ४ मार्च २०१९ रोजी उत्तर गोव्यात घडली होती. तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले होते, की ‘एनजीओ’शी संबंधित असलेल्या आरोपी हेंड्रिक्स यांनी मदतीच्या बहाण्याने तिच्या घरी जाऊन लैंगिक अत्याचार केला होता.

Goa Accident Case 2016
Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

अनेकवेळा न्यायालयीन समन्स दिल्यानंतरही तक्रारदाराने सांगितले, की ती आजारी असल्याने न्यायालयात येऊ इच्छित नाही आणि प्रकरण पुढे नेऊ इच्छित नाही. तसेच या प्रकरणातील केंद्रीय न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल हरवला असल्याचे नोंदविण्यात आले आणि तो न्यायालयासमोर सादर झाला नाही, असे न्यायालयाने आदेशात अधोरेखित केले.

Goa Accident Case 2016
Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

फोन, कॉल डेटा नाही

तपासादरम्यान तक्रारदार महिलेचा फोन, कॉल डिटेल रेकॉर्ड, लोकेशन डेटा गोळा करण्यात आले नाहीत; घटनास्थळी कोणतीही फॉरेन्सिक टीम पाठविण्यात आली नव्हती.

न्यायालयात जबाब देणाऱ्या डॉक्टरांनी स्वतः तपासणी केली नव्हती, त्यांनी केवळ दुसऱ्या डॉक्टरच्या स्वाक्षरीची ओळख दिली. वैद्यकीय अहवालात कोणतीही ताजी दुखापत आढळली नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com