Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

Goa Crime News: उपचारासाठी रुग्णवाहिकेतून डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेले असता, तेथील डॉक्टरांनी बालिका मृत झाल्याचे घोषित केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: म्हावळींगे येथे आईनेच आपल्या अडीच वर्षांच्या मुलीचा गळा घोटून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. केवळ प्रियकरासाठीच हा खून करण्यात आला, हे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आई नागम्मा व तिचा प्रियकर नितीनकुमार पुजारा यांना डिचोली पोलिसांनी अटक केली असून दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणी गुरुवारी रात्री डिचोली पोलिसांनी तसेच फॉरेन्सिक विभागाने म्हावळींगे येथे जाऊन पुरावे जमा केले होते. त्यातून काही संशयास्पद धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि डिचोलीच्या पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीचे पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर या खूनप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

मूळ कर्नाटकमधील नागम्मा ही पतीला सोडून आपल्या प्रियकरासमवेत पळून अलीकडेच गोव्यात आली होती. येताना तिने आपल्या पोटच्या चिमुकलीला आणले होते. गेल्या काही दिवसांपासून बालिकेसह नागम्मा आणि नितीनकुमार येथील एका बागायतीतील घरात भाड्याच्या खोलीत राहत होती.

प्रियकर नितीनकुमार हा परिसरातील एका चिरेखाणीवर मजुरी करीत होता. नागम्मा आणि नितीनकुमार हे दोघेही अधूनमधून बालिकेला मारहाण करीत होते, अशी माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे.

म्हणून खुनाला वाचा फुटली

मिळालेल्या माहितीनुसार, नागम्मा आणि तिचा प्रियकर नितीनकुमार हे दोघेही बुधवारी डिचोलीच्या आठवडी बाजाराला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत मृत बालिकासुद्धा होती. सायंकाळी प्रवासी बसमधून म्हावळींगे येथे उतरल्यानंतर खोलीवर जाताना बेशुद्धावस्थेत दुर्दैवी बालिकेला एका दुकानावर घेवून गेली असता, तेथील कोणीतरी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले.

उपचारासाठी रुग्णवाहिकेतून डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात नेले असता, तेथील डॉक्टरांनी बालिका मृत झाल्याचे घोषित केले. मात्र, बालिकेच्या अंगावर व्रण असल्याने डॉक्टरांनी या प्रकाराची डिचोली पोलिसांना माहिती दिली आणि तेथूनच या खुनाला वाचा फुटली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT