Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality: कचरा संकलनाची मुदतवाढ न केल्यास काम बंद करणार!

Mapusa Municipality: यासंदर्भात म्हापसा पालिकेस नोटीस बजावण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: म्हापसा येथील प्रभाग 1 ते प्रभाग 10 मधील आउटसोर्स कचरा संकलनाच्या मुदतवाढीच्या मुद्‌द्यावर संबंधित कचरा संकलक कंपनीने म्हापसा पालिकेला इशारा दिला आहे की, ही सेवा विस्तारित न केल्यास कंपनी येत्या 1ऑक्टोबरपासून वरील दहा प्रभागांमधील घरोघरी कचरा संकलनाचे काम बंद करेल. यासंदर्भात कंपनीकडून म्हापसा पालिकेस नोटीस बजावण्यात आली आहे.

याविषयी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कचरा संकलनाविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण, नगरपालिका पुन्हा घरोघरी कचरा संकलन सुरू करेल तसेच प्रभाग 1 ते प्रभाग 10 मधील कचरा संकलनाचे काम हे आपल्या पालिका कर्मचाऱ्यांचा वापर करून पूर्ण करेल.

उपलब्ध माहितीनुसार, बाविश वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला, आउटसोर्स केलेल्या प्रभाग 1 ते प्रभाग 10 मधील कचरा संकलनाचे कंत्राट दिले होते. त्यांनी आता पालिकेला लेखी पत्र दिले आहे. ही कंपनी 27 ऑगस्ट 2021 पासून आजपर्यंत कचरा उचलण्याचे काम करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरा आउटसोर्स कंत्राटदाराचा करार हा 26 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात आला आहे. तरीही, त्यांनी कचरा उचलण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

पत्रात कंपनीने म्हटले आहे की, कचरा गोळा न करणे ही एक गंभीर समस्या आहे. आमच्या कंपनीची मूल्ये आम्हास पुरेशी कल्पना न देताच, काम थांबविण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे मुदतवाढीविषयी पालिकेकडून आवश्यक सूचना न मिळाल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून या प्रभागांमधील कचरा संकलनाचे काम हे बंद पाडले जाईल.

दरम्यान, नुकताच पालिकेच्या बैठकीत प्रभाग 1 ते प्रभाग 10 मधील कचरा कंत्राटदाराला 13 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कंत्राटदाराला पालिकेच्या निधीतून देय देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. हा निर्णय मतदानाने मंजूर करण्यात आलेला. त्यावेळी चार नगरसेवकांनी विरोधात मतदान केले, तर 16 जणांनी त्यास अनुमोदन दिले होते.

पालिका कचरा उचलेल

या मुद्द्यांवर मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, पालिका प्रभाग 1 ते प्रभाग 10 मध्ये पालिका कर्मचाऱ्यांचा वापर करून कचरा उचलण्याचे काम केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tisk-Usgao Accident: मध्यरात्री उसगावात दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात; मागे बसलेला युवक जखमी

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

SCROLL FOR NEXT