Mumbai Goa police Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Police: गोव्याच्या दिशेने येणाऱ्या टॅंकरमध्ये आरडीएक्स नव्हे, पॉलिथिन साहित्य

पोलिस अधिकाऱ्यांकडून स्पष्टोक्ती : ‘ती’ अफवाच; टॅंकर रत्नागिरीत ताब्यात

गोमन्तक डिजिटल टीम

Mumbai Goa police आरडीएक्स असलेला एक टँकर गुजरातहून गोव्याकडे निघाल्याची ती केवळ अफवाच ठरली. प्रथमदर्शनी या टँकरमध्ये कोणत्याच प्रकारची स्फोटके तपासणीत आढळून आलेली नाही. ज्या व्यक्तीने फोनवरून ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती ती खोटी असल्याचे एका वरिष्ठ गोवा पोलिस अधिकाऱ्याने ‘गोमन्तक’ ला सांगितले.

माहिती मिळताच, गोव्याच्या सीमेवर नाकांबदी करण्यात आली होती. हा टँकर गोव्यात पोहचण्यापूर्वीच रत्नागिरी पोलिसांनी आज पहाटेच ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.

गोवा पोलिस नियंत्रण कक्षाला काल रात्री दोन वाजता मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून फोन आला होता. गुजरातहून एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला असून त्यामध्ये आरडीएक्स आहे, अशी माहिती देण्यात आली होती.

त्यामुळे गोव्याची पोलिस यंत्रणा खडाडून जागी झाली होती. गोव्यातील सर्व सीमेवर पोलिस नाकाबंदी करण्यात आली होती. कथित आरडीएक्स असलेला टँकर रत्नागिरी पोलिसांनी अडविला व चौकशीसाठी ताब्यात घेतला. या चौकशीमध्ये आरडीएक्स सापडले नसल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांकडून मिळाली आहे.

संगमेश्वर येथे टँकरची तपासणी

या फोनमुळे पोलिस विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी तातडीने नाकाबंदी केली. तपासणीत एक टँकर संगमेश्वर येथे पोलिसांकडून थांबवण्यात आला.

टँकर चालकाची चौकशी आणि टँकरची बॉम्बशोध व नाशक पथकाकडून झडती घेतल्यावर टँकरमध्ये कोणतीही स्फोटके मिळून आलेली नाहीत.

त्या टँकरमध्ये पॉलिथिन बनवण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून त्या निनावी फोनमुळे पोलिस यंत्रणा कामाला लागली होती.

नाकाबंदी उठवली

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने टॅंकरमध्ये आरडीएक्स असल्याची माहिती मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला दिली होती. या माहितीकडे दुर्लक्ष न करता मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांनी सतर्क केले होते. हा टँकर रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सध्या तरी गोव्यातील सीमेवरील पोलिस नाकाबंदी उठवण्यात आल्याची माहिती गोव्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

Goa Live News: पर्वरी येथे 'रेंट-अ-कार' आणि टुरिस्ट टॅक्सीचा अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

Illegal Club House Margao: 'हा कशाचा विकास'? मडगाव येथे भर रस्त्यावरच उभारले ‘क्लब हाऊस’; काँग्रेस आक्रमक

Goa ZP Election: गोवा फॉरवर्डने फोडला प्रचाराचा नारळ! कोलवाळ, हळदोणे, शिरसईत नारीशक्तीचे वर्चस्‍व; सत्तरीतील मतदारसंघांत मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT