Mumbai Goa Indigo Flight  Dainik Gomantak
गोवा

Goa Mumbai Flight: गोवा - मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी; पोलिस यंत्रणेची उडाली तारांबळ

Goa Mumbai Flight Bomb Hoax: मुंबई विमानतळावर विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

Pramod Yadav

Goa Mumbai Flight Bomb Hoax

मुंबई: गोव्यातून मुंबईला निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी सोमवारी (१३ जानेवारी) सायंकाळी इंडिगो विमान कंपनीला मिळाली. धमकी मिळाल्यानंतर मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढविण्यात आली. लँडिंगनंतर विमानतळावर विमानाची तपासणी केल्यानंतर धमकी अफवा असल्याचे उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान 6E 5101 हे गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची कंपनीला धमकी मिळाली. धमकीची माहिती समोर आल्यानंतर आवश्यकतेनुसार सर्व खबरदारी घेण्यात आली.

गोवा विमानतळावर देखील सर्व संबधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. विमानतळावर विमानातून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

विमान आयसोलेट ठेवून सुरक्षा यंत्रणांनी विमानाची संपूर्ण तपासणी केली. तपासाअंती विमान पूर्णत: सुरक्षित असून, बॉम्बची धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती विमान कंपनीने मंगळवारी (१४ जानेवारी) दिली. अखेर बॉम्ब नसल्याची खातरजमा झाल्यानंतर विमाने मुंबईसाठी उड्डाण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Temple Festival: शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा कालोत्सव, 28 पासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

Gobi Manchurian Ban: डिचोलीत 'गोबी मंचूरियन'वरील बंदी ठरली यशस्वी, 'एफडीए'चा धसका

Goa Tourism: क्रूझ पर्यटन हंगामाला सुरुवात, पहिले जहाज दाखल; 2 हजार पर्यटकांनी घेतले गोवा दर्शन

Goa Agriculture: कृषी लागवडीत 1.927 हेक्‍टरने घट! भात लागवडीचे 10,207 हेक्‍टर क्षेत्र घटले; 11 वर्षांचा तपशील

Tiger Reserve Goa: दोन टप्प्यांत व्याघ्र प्रकल्प साकारा! पाहणीअंती सक्षम समितीची शिफारस; 15 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

SCROLL FOR NEXT