Margao Goa: सांडपाणी नाल्यांत सोडले, मडगावातील 21 दुकाने सील, 46 दुकानांना नोटीस

Goa Pollution Control Board: सासष्टीचे मामलेदार विमोद दलाल यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
Margao Goa: सांडपाणी नाल्यांत सोडले,  मडगावातील 21 दुकाने सील, 46 दुकानांना नोटीस
Margao GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाल्यांमध्ये सांडपाणी सोडल्याबद्दल मडगावातील ४६ दुकानांना नोटिसा जारी करून २१ दुकानांना सील ठोकले. त्यात प्रामुख्याने उपाहारगृहे आणि अन्य स्टॉल्सचा समावेश आहे. काल आणि आज असे दोन दिवस ही कारवाई करण्यात आली.

सासष्टीचे मामलेदार विमोद दलाल यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन केलेल्या मालकांनी त्यांचे व्यवसाय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत किंवा पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल असा आदेश त्यांना देण्यात आला, असे दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाळे यांनी संगितले.

Margao Goa: सांडपाणी नाल्यांत सोडले,  मडगावातील 21 दुकाने सील, 46 दुकानांना नोटीस
Goa Chicken Shortage: गोव्यात 'बॉयलर चिकन'चा तुटवडा; महाराष्ट्रातील आमदार घालणार लक्ष, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मडगावातील एकूण ४६ आस्थापने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गेल्या सोमवारपासून ती सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि काल सोमवारी सायंकाळपर्यंत १६ आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले. आज मंगळवारी दुपारपर्यंत त्यात आणखी पाच दुकानांची भर पडली.

Margao Goa: सांडपाणी नाल्यांत सोडले,  मडगावातील 21 दुकाने सील, 46 दुकानांना नोटीस
Cyber Crime: अक्षर साक्षरतेमध्ये आघाडीवर असणारा गोवा, आर्थिक साक्षरतेमध्ये पिछाडीवर का?

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की मडगावमधील असंख्य हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, कचरा आणि स्वयंपाकघरातील सांडपाणी वाहत्या नाल्यांमध्ये सोडण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com