Goa women MSME percentage Dainik Gomantak
गोवा

राज्‍यातील 39 टक्‍के 'एमएसएमईं'वर महिलाराज! लोकसभेत केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांच्‍या लेखी उत्तरातून समोर

Goa women MSME percentage: ३९ टक्‍के उद्योग महिलांच्‍या हातात असल्‍याचे केंद्रीय ‘एमएसएमई’ राज्‍यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यातील सूक्ष्‍म, लघू आणि मध्‍यम (एमएसएमई) उद्योगांपैकी ३९ टक्‍के उद्योग महिलांच्‍या हातात असल्‍याचे केंद्रीय ‘एमएसएमई’ राज्‍यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

‘एमएसएमईं’ना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. असे उद्योग कमी भांडवलात रोजगार निर्मिती, ग्रामीण विकास आणि निर्यातीत मोठी भूमिका बजावतात. त्‍यामुळे केंद्र सरकारने गेल्‍या काही वर्षांपासून गोव्‍यासह देशभरातील ‘एमएसएमईं’ना बळकटी देण्‍यास सुरुवात केलेली आहे.

अशा उद्योगांत येण्‍यास इच्‍छूक असलेल्‍यांना उद्यम नोंदणी पोर्टलद्वारे सरकारी लाभ, कर्ज सुविधा आणि कायदेशीर संरक्षण देण्‍यात येते. त्‍यामुळे गोव्‍यातील हजारो नागरिकांनी केंद्र सरकारच्‍या योजना आणि कमी व्‍याजदरातील कर्जाचा लाभ घेऊन ‘एमएसएमई’ सुरू केलेले आहेत.

यंदा राज्‍यात २२,१६९ ‘एमएसएमई’ सुरू असून, त्‍यातील ८,६४५ म्‍हणजेच ३९ टक्‍के ‘एमएसएमई’ हे महिलांच्‍या मालकीचे असल्‍याचे मंत्री करंदलाजे यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

दरम्‍यान, देशभरातील अधिकाधिक ‘एमएसएमई’ स्‍थापन करून त्‍यातून अर्थव्‍यवस्‍थेला चालना देण्‍याचे तसेच युवक–युवतींसाठी रोजगारसंधी उपलब्‍ध करून देण्‍याचे प्रयत्‍न केंद्र सरकारकडून सुरू आहेत, असेही मंत्री करंदलाजे यांनी नमूद केले आहे.

राज्‍यातील ‘एमएसएमईं’ स्‍थिती

वर्ष एकूण महिलांच्‍या हाती असलेले

२०२०–२१ ५,९९२ १,११४

२०२१–२२ ८,५५२ १,८६२

२०२२–२३ १५,३९९ ३,७२३

२०२३–२४ ४६,०७५ २२,००२

२०२४–२५ ३१,९६४ १३,०६५

२०२५–२६ २२,१६९ ८,६४५.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT