Pratiksha Khalap, Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa MSME Industry: राज्यातील सूक्ष्म, लघु उद्योग बंद पडण्यामागील कारणं द्या! काँग्रेसची सरकारकडे मागणी; जीएसटी बचत उत्सवावरही साधला निशाणा

msme closure reasons in goa: राज्यातील सद्यःस्थितीत किती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) बंद पडले आहेत आणि ते बंद पडण्यामागील कारणे काय आहेत.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील सद्यःस्थितीत किती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) बंद पडले आहेत आणि ते बंद पडण्यामागील कारणे काय आहेत, याची सविस्तर माहिती राज्य व केंद्र सरकारने द्यावी, अशी मागणी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी केली. दरम्यान, सध्या कार्यरत असलेल्या स्टार्टअप्सची संख्या, महिलांच्या स्वयंसाह्य गटांचे लेखापरीक्षण राज्य सरकारने सार्वजनिक करावे, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेस (Congress) भवनात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी महिला काँग्रेसच्या जेनिफर लोबो व ॲड. शबनम खान यांची उपस्थिती होती.

उद्यम पोर्टलवरील माहितीचा संदर्भ देत खलप म्हणाल्या, जानेवारी २०२५ पर्यंत गोव्यात १.१७ लाख एमएसएमई नोंदणीकृत आहेत, त्यापैकी १५६ बंद पडले आहेत. प्रमाणित स्टार्टअप्सची संख्या २४१ असली तरी त्यांची प्रत्यक्ष कार्यान्वित असलेल्यांची माहिती उपलब्ध नाही. या त्यातील स्टार्टअप्सपैकी ७६ महिलांनी स्थापन केले आहेत, म्हणजे हे प्रमाण ३३ टक्के आहे.

त्या पुढे म्हणाल्या, राज्यात ३,२५० स्वयंसहाय्य गट नोंदणीकृत आहेत, त्यांपैकी किती सक्रिय आहेत किंवा किती बंद आहेत, याची माहिती उपलब्ध नसल्याचे त्या म्हणाल्या. राज्य सरकार १७० स्वयंसाहाय्य गटांना कँटीनसारख्या व्यवसायांसाठी मान्यता दिल्याचे सांगते, पण प्रत्यक्षात केवळ १७ गट कार्यरत आहेत, त्यामुळे उर्वरित गट केवळ कागदोपत्री आहेत का? असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर राज्यात कोणते नवे उद्योग आले, त्यातून युवक व महिलांसाठी किती रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या याची माहितीही सरकारने द्यावी. राज्यातील सिंगल विंडो क्लीअरन्स यंत्रणा फसवी असल्याचा आरोपही त्यांनी केला. जीएसटी हा त्रूटीपूर्ण कार्यक्रम आहे.

जीएसटी बचत उत्सवावर टीका

ॲड. खान म्हणाल्या, जीएसटी (GST) बचत उत्सव ऐवजी त्याला ‘चापट उत्सव’ म्हणावा लागले, अशी टीका त्यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, महागाई व कर व्यवस्थेमुळे महिलांना जाणवणाऱ्या अडचणी सोडविण्याकडे सरकारने लक्ष द्यावे.

आधीचा जीएसटी व्यवसाय सोपा करण्याऐवजी मासिक रिटर्न, तिमाही सारांश आणि वेबसाईट क्रॅशमुळे अधिक गुंतागुंतीचा ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

Goa Live News: "जिथे बोलणे कर्तव्य आहे, तिथे गप्प राहणे हा गुन्हा"; न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांचे मार्मिक उद्गार

VIDEO: बाप के साये का असर होता है... रस्त्यावर खेळणी विकणाऱ्या वडिलांच्या पायाला धरुन झोपला चिमुकला; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT