Goa, Cacora Industrial Estate: काकोडयातील औद्योगिक वसाहतीमधील गौरी पॅकेजिंगला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान

Goa News: काकोडा औद्योगिक वसाहतीत असलेल्या गौरी पॅकेजिंगला आज (दि. २६ ऑक्टोबर) रोजी भीषण आग लागली.
Goa, Cacora Industrial Estate: काकोडयातील औद्योगिक वसाहतीमधील गौरी पॅकेजिंगला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
Goa, Cacora Industrial EstateDainik Gomantak
Published on
Updated on

Sanguem, Goa

काकोडा : काकोडा औद्योगिक वसाहतीत असलेल्या गौरी पॅकेजिंगला आज (दि. २६ ऑक्टोबर) रोजी भीषण आग लागली. गौरी पॅकेजिंग एक कारबोर्ड बनवणारी मॅन्युफॅक्चरींग कंपनी आहे. पहाटे ४:०० ते ४:३० च्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र हा संपूर्ण प्रकार शॉर्टसर्किटमुळे घडला असावा अशी शंका अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.

Goa, Cacora Industrial Estate: काकोडयातील औद्योगिक वसाहतीमधील गौरी पॅकेजिंगला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
संतापजनक! गोव्यात रेल्वे स्थानकावर महिलेस प्रसव वेदना; तास उलटूनही रुग्‍णवाहिकेचा पत्ता नाही, अखेर युवक धावला मदतीस

काकोडा औद्योगिक वसाहतीला आग लागल्याची माहिती मिळताच कुडचडे, मडगाव, फोंडा तसेच कुंक्कळी येथील अग्निशामक दलांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवले. या ठिकाणी गौरी पॅकेजिंगद्वारे विविध उत्पादनांचे पॅकिंग केले जाते आणि आज लागलेल्या आगीमुळे लॅपटॉपसह काही मशिनरी आणि संगणक जळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com