Illegal construction Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal construction: दाबोळीतील फ्लाइट लँडिंग झोनजवळील अवैध घरे पाडली; नौदलाच्या आक्षेपानंतर कारवाई

Goa Illegal construction: एमपीडीएचे सदस्य सचिव संजय आनुर्लेकर यांनी या संबंधीची माहिती दिली.

Ganeshprasad Gogate

Goa Illegal construction: मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाने दाबोळी येथील फ्लाइट लँडिंग झोनजवळ फनेल झोनमधील (विमानतळ उड्डाण क्षेत्राजवळील) 11 घरे उंचीच्या निर्बंधांच्या आधारे पाडली असल्याची माहिती समोर येतेय.

भारतीय नौदलाने या घरांच्या बांधकामावर 15 वर्षांपूर्वी आक्षेप घेतला होता. एमपीडीएचे सदस्य सचिव संजय आनुर्लेकर यांनी या संबंधीची माहिती दिली.

दरम्यान गोव्यातील अवैध बांधकाम विरोधात प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली असून काही दिवसांपूर्वी वागातोर येथील किनारपट्टी लगतचे बांधकाम पर्यटन मंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी पाडले होते. विशेष म्हणजे ता रेस्टोरंटवर आतापर्यंत प्रशासनाने तीनवेळा कारवाई केली होती.

तसेच गिरकरवाडा - हरमल येथील सर्वे क्रमांक 63/92 जागेतील हॉटेलचे बेकायदा बांधकाम दिलेल्या मुदतीत जमीनदोस्त करण्यास आणखी मुदतवाढीसाठी केलेल्या अर्जावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बांधकाम मालक अशोक खंडारी यांची चांगलीच कानउघाडणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT