Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem: मयेत मोटारसायकलला आग; मुद्दामहून पेटवल्याचा संशय, पोलिस तपास सुरू

Motorcycle Fire Incident: घराच्या अंगणात पार्क करून ठेवलेल्या मोटारसायकलला आग लागून ती भस्मसात झाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: घराच्या अंगणात पार्क करून ठेवलेल्या मोटारसायकलला आग लागून ती भस्मसात झाली. ही घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मये येथील केळबायवाडा येथे घडली. आगीने मोठा भडका उडाल्यानंतर घराच्या वाशांना काही प्रमाणात झळ बसली. मात्र, आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला.

आग नेमकी कशी लागली, हे समजू शकले नाही. मात्र, कोणीतरी मुद्दामहून मोटारसायकल पेटवली असल्याचा संशय मोटारसायकलचे मालक प्रसाद माटणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी केरोसीनची रिकामी बाटली आणि माचीस टाकून दिल्याचे निदर्शनास आले आहे. या आगप्रकरणी डिचोली पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, केळबायवाडा येथील प्रसाद माटणेकर यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री आपली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अंगणात घराला टेकून पार्क केली होती. पहाटे सुमारे सहा वाजता धुराचा वास येऊ लागल्याने प्रसाद यांची पत्नी प्रशिला घराबाहेर आल्या. त्यावेळी त्यांना मोटारसायकल पेटल्याचे दिसले.

त्यांनी मदतीसाठी आवाज दिल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.घटनेची माहिती डिचोली अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत स्थानिकांना आग विझवण्यात यश आले होते. डिचोली पोलिसांना कळवताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT