Electrical Accident Dainik Gomantak
गोवा

Electrical Accident: लाईन दुरुस्ती करत असताना शॉक लागून मोरजीतील वीज कामगाराचा मृत्यू

Electrical Accident: शॉक लागताच लोडरच्या साहाय्याने पोलच्या अर्ध्याभागापर्यंत आले आणि तिथूनच खाली कोसळले आणि बेशुध्द झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Electrical Accident पोर्तावाडा -शिवोली येथे वीज खांबावर चढून काम करतांना अचानक प्रवाह सुरू झाल्याने वीजेचा शॉक लागून कृष्णा पवार (वय 42) या वीज कामगाराचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना गुरुवारी (दि. 23 नोव्हेंबर) संध्याकाळी घडली.

या संबंधी मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार गुरुवारी संध्याकाळी ४ च्या दरम्यान वीज खात्याला शिवोली- मधलावाडा येथील लाईन कट झाल्याचा फोन आला.

त्या कामाची दुरुस्ती करण्यासाठी लाईनमन- कृष्ण नाईक आणि हेल्पर - कृष्णा पवार हे घटनास्थळी रवाना झाले. कामकाजावेळी कृष्णा पवार हे पोलवर चढून दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना विजेचा करंट लागला.

शॉक लागताच ते पोलवर चढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोडरच्या साहाय्याने पोलच्या अर्ध्याभागापर्यंत आले आणि तिथूनच खाली कोसळले आणि बेशुध्द झाले.

ही घटना घडताच लाईमान आणि तेथील लोकांनी त्यांना शिवोली येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले. तिथे त्यांच्या ECG सारख्या चाचण्या करण्यात आल्या. त्याचे सर्वे रिपोर्ट नॉर्मल आले.

परंतु त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने म्हापसा येथे नेत असताना अँब्युलन्स मध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार असल्याची देखील माहिती मिळ्तेयय.

दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय. आमदार जीत आरोलकर हे घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी लाईनमन कृष्णा नाईक याच्याशी त्यांनी घटनेची माहिती विचारण्यास सुरवात केली.

तसेच मृत कृष्णा पवार यांचेही नातेवाईक तेथे उपस्थित असल्याने त्यांनीही नाईक यांना घटनाक्रम विचारला असता त्यांच्या कडून असंबधित उत्तरे मिळू लागली.

त्यामुळे साहजिकच जनक्षोभ उसळला. वीजखात्याचे हरीश रायकर आणि विशाल तांबोस्कर हे घटनास्थळी दाखल झाल्यावर जमावाने रायकर यांना कामात निष्काळजीपणा असल्याची खोट काढून मारहाण केली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा कृष्णा पवार हे मोरजी येथील रहिवासी होते. गेली अनेक वर्षे ते शिवोलीतील वीज केंद्रात सहाय्यक लाईनमन म्हणून कामाला होते.

त्याच्या अपघाती निधनामुळे शिवोलचे माजी उपसरपंच फ्रेडी फर्नाडिस तसेच विद्यमान सरपंच अभय शिरोडकर यांनी दुःख व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT