Electricity Department | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: 57 लाखांचे वीजबिल अखेर 568 रुपयांवर स्‍थिरावले

Goa News: मांद्रेतील प्रकार : वीज खात्याचा भोंगळ कारभार, ग्राहकाला नाहक मनस्ताप

दैनिक गोमन्तक

Goa News: वीज खात्याचा एक अजब कारभार समोर आला आहे. खात्याने देऊळवाडा-मांद्रे येथील केशव मंगेश मांद्रेकर यांना ऑक्टोबर महिन्याचे वीज बिल तब्बल 57 लाख 36 हजार रुपये इतके पाठविले होते. या प्रकाराची राज्यभर चर्चा झाल्याने वीज खात्याने तत्काळ दुरुस्ती करत 568 रुपयांचे बिल दिले.

केशव मांद्रेकर यांना कधी 800 रुपयांहून अधिक बिल आले नाही. मात्र, ऑक्टोबर महिन्याचे बिल तब्बल 57 लाख 36 हजार 285 रुपये इतके आल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ आगरवाडा येथील उपविभागीय वीज केंद्रात जात तेथील अधिकाऱ्यांकडे चर्चा केली.

त्यावर अधिकाऱ्यांनी आपण यावर चर्चा करून विजेचे बिल सुरळीत करून घेऊत असे आश्‍वासित केले. त्यानुसार आज सायंकाळपर्यंत मांद्रेकर यांना 568 रुपयांचे बिल देण्यात आले.

"चुकीसाठी जबाबदार असलेल्या दोन कर्मचारी मीटर रीडर आणि बिल तपासणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. बिलात झालेली चूक सिस्टिमवर दाखवली जाते, तेव्हा ती दुरुस्त केली गेली नाही."

- स्टिफन फर्नांडिस, मुख्य अभियंता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Court Verdict: मंत्री मॉविन गुदिन्हो यांना मोठा दिलासा, 4.52 कोटींच्या वीजदर सवलत घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता

Goa Politics: लोबोंना फेरबदलाची गाडी चुकली, बंडखोरी आड आल्याची चर्चा, 'तसं' झाल्यास वेगळी चूल मांडण्याचीही शक्यता

Goa Accident: अखेर 'त्या' निष्काळजी चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! स्टँड फोडून, अष्टमीच्या फेरीत घुसली बस

Stray Dogs Goa: कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लसीकरण मोहीम राबवा, गोवा ॲनिमल फेडरेशनची मागणी; वर्षभरात केवळ 15 हजार लसीकरण

Illegal Mining in Goa: फोंडा पोलिसांची धडक कारवाई! मरड धारबांदोडा येथील बेकायदा चिरेखाणीवर छापा, मजुरांनी काढला पळ

SCROLL FOR NEXT