morajit road traffic problem today Dainiak Gomantak
गोवा

Morajit Traffic Jam: मोरजीत वाहतुकीचा खेळखंडोबा! रस्त्याच्या बाजूनेच वाहनांचे ‘पार्किंग’; नागरिक त्रस्त

Morjim Beach Traffic Congestion: मोरजी पंचायत क्षेत्रातील तेमवाडा समुद्रकिनारी भागात पर्यटक तसेच स्थानिक मोठ्या संख्येने येतात. मात्र, पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनियमितपणे उभी केली जातात.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी : मोरजी पंचायत क्षेत्रातील तेमवाडा समुद्रकिनारी भागात पर्यटक तसेच स्थानिक मोठ्या संख्येने येतात. मात्र, पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनियमितपणे उभी केली जातात. परिणामी, वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रविवार व सुट्टीच्या दिवशी या किनारी भागातील मुख्य रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे ट्राफिक पोलिस तैनात करून कोंडीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पंच मुकेश गडेकर यांनी केली आहे. समुद्रकिनारी भागात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

एप्रिल-मे महिन्यात गोमंतकीय व देशी पर्यटक गटागटांनी समुद्रस्नानासाठी येथे गर्दी करतात. मात्र, पार्किंग सुविधेअभावी वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. काही वाहनचालकांना घाई असल्याने परिस्थिती अधिकच बिघडून कोंडी निर्माण होते.

पार्किंग प्रकल्पाचे काय?

  • दरवर्षी पर्यटन हंगामात सरकार विविध उपक्रम राबवते. त्याअंतर्गत तेमवाडा समुद्रकिनारी बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. याचे भूमिपूजनही झाले होते. मात्र, काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतल्याने प्रकल्प अद्याप रखडला आहे. आता हा प्रकल्प कधी साकारला जाणार याकडे लक्ष लागले आहे.

  • सरकारने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावल्यास रस्त्यावर होणारे अनियमित पार्किंग आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. यासाठी स्थानिक पंचायत, तसेच आमदार जीत आरोलकर यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT