Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach Goa: पारंपरिक मच्छीमारांनी बनवलेल्या झोपड्या पर्यटन विभागाने हटवल्या

नारळी पौर्णिमेच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने मच्छीमार बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले

Ganeshprasad Gogate

Morjim Beach Goa मोरजी विठ्ठलदास वाडा येथे मच्छीमार बांधवांनी पर्यटन क्षेत्राच्या जागेत उभारलेल्या झोपड्या पर्यटन विभागाकडून पाडण्यात आल्या. विशेष म्हणजे काल नारळी पौर्णिमेच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने मच्छीमार बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या पाडण्यात आलेल्या झोपड्यांमुळे मच्छीमारांची जाळी ठेवण्याची गैरसोय निर्माण झाली आहे.

तसेच झोपड्या पाडल्यामुळे मच्छीमारांच्या इतर साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. पर्यटन विभागाने पारंपरिक मच्छीमारांनी बनवलेल्या झोपड्या हटवल्या मात्र त्यांना मोठ्या हॉटेलांचे अतिक्रमण पाडता येत नाही असा संताप यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

मागच्या सात वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती आणि त्यात किनाऱ्या लगतच्या सात-आठ होड्यांना आगी लावून जाळल्या होत्या.

झोपड्या पाडत असल्याची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणी स्थानिक पंच विलास मोरजे, माजी उपसरपंच अमित शेडगावकर, माजी सरपंच मंदार पोके पंच मुकेश गडेकर आणि नागरिकांनी घटनास्थळीत भाव घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

SCROLL FOR NEXT