Banastarim Bridge Accident प्रकरणी अमित पालेकर यांचा अंतरिम जामीन मंजूर

अमित पालेकर यांनी एका बनावट चालकाला तयार केले आणि त्याला म्हार्दोळ पोलिस स्थानकात नेले होते
Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested
Banastarim Bridge Accident: Amit Palekar ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident बाणस्तारी येथे झालेल्या मर्सडीज अपघात प्रकरणात क्राईम ब्रँचने गुरूवारी आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांना अटक केली. दरम्यान याच संबंधी एक महत्वाची अपडेट हाती येतेय,

जिल्हा व सत्र न्यायालयाने अमित पालेकर यांना 50 हजार रुपयांच्या जामीन जातमुचलक आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनावर पुढील आदेशापर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

या अपघातातील मर्सडीज परेश सावर्डेकर चालवत होता. त्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तिघांचा बळी घेतला होता. तथापि, त्याचा बचाव करण्यासाठी अमित पालेकर यांनी एका बनावट चालकाला तयार केले आणि त्याला म्हार्दोळ पोलिस स्थानकात नेले होते, असे तपासात आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

Banastarim Bridge Accident: Amit Palekar Arrested
Amit Palekar Arrested: बाणस्तारी मर्सडीज अपघात प्रकरणी 'आप'चे नेते अमित पालेकर यांना अटक; पालेकर म्हणतात, हे भाजपचे डर्टी पॉलिटिक्स...

दरम्यान या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता तर तिघे जण जखमी झाले होते. एका पार्टीतून बाहेर पडल्यानंतर सावर्डेकर कुटूंबीय मर्सडीजमधून जात असताना हा अपघात झाला होता.

त्या पार्टीचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यात अमित पालेकर देखील दिसून येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Court Bail Rejection
Student Protest Police Lathicharge
Amit Shah, BL Santosh Goa visit
amit palekar slams mauvin godinho
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com