Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ सुरु राहणार की, बंद?

Dabolim Airport: केंद्र सरकारने गोवा सरकारला लिहिलेल्या पत्रात मोपा विमानतळ सुरु झाल्यावर दाबोळी विमानतळ बंद केला जाईल,अशी स्पष्ट सूचना पत्रात दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ देशी विमानांसाठी, तर मोपा आंतरराष्ट्रीय विमानासाठी खुला असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली असली तरी 2000 साली केंद्र सरकारने गोवा सरकारला लिहिलेल्या पत्रात मोपा विमानतळ सुरू झाल्यावर दाबोळी विमानतळ बंद केला जाईल, अशी स्पष्ट सूचना दिलेले पत्र आता उजेडात आल्याने दाबोळी विमानतळ सुरू राहाणार की, बंद होणार हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

फ्रान्सिस सार्दिन हे गोव्याचे मुख्यमंत्री असताना 1 मे 2000 रोजी केंद्राकडून त्यावेळचे राज्याचे मुख्य सचिव अशोक नाथ यांना एक पत्र आले होते. त्यात 29 मार्च 2000 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एकदा मोपा विमानतळ सुरू झाला की, दाबोळी विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. सध्या हे पत्र समाज माध्यमांवर फिरत आहे.

एवढे दिवस कुणीही कधी उल्लेख न केलेले हे पत्र उजेडात आल्याने परत एकदा दक्षिण गोव्यात दाबोळीबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, त्यावेळी हे पत्र आले होते का नाही, याची खुद्द सार्दिन यांनाही जाणीव नाही.

तसेच, त्यांना याबद्दल विचारले असता, अशा आशयाचे पत्र आले होते की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, 2009 मध्ये मी खासदार असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी दाबोळीचे अस्तित्व कायम राहाणार, असे सांगत दाबोळीच्या विस्तारासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले होते, असे सांगितले.

सार्दिन म्हणाले, त्यावेळी चर्चिल आलेमाव यांनी दाबोळी विमानतळ ( Dabolim Airport) कायमचा बंद होणार, मुद्दा पुढे आणून विधानसभा निवडणुकीत माझा पराभव केला. त्यानंतर लोकसभा पोटनिवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत मी जिंकलो. त्यावेळी मी तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सांगून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सचिवांची बैठक आयोजित केली.

पहिल्या बैठकीत मला मोपा (Mopa) सुरू झाल्यास दाबोळी बंद होणार, असे सांगण्यात आले. तेव्हा मी मोपा विमानतळाला विरोध केला. त्यानंतर तीन महिन्यांनी आणखी एक बैठक झाली, त्यात दोन्ही विमानतळ सुरू ठेवणार असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. आदरतिथ्य व्यवसायातील गोव्यातील शिखर संस्था असलेल्या ‘टीटीएजी’ या संघटनेचे अध्यक्ष नीलेश शहा यांनीही दाबोळी बंद होण्याची शक्यता कमीच, अशी शक्यता व्यक्त केली.

मार्च 2000 मध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला होता की नाही ते मला माहीत नाही. मात्र, त्यानंतर मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पुढाकार घेऊन मोपा विमानतळाचे प्रवर्तक असलेल्या जीएमआर कंपनीशी जो करार केला, त्यात गोव्यात मोपा आणि दाबोळी हे दोन्ही विमानतळ सुरू राहाणार, असे स्पष्टपणे नमूद केले आहे, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT