Ravi Naik: राज्यातील युवकांना कृषी क्षेत्रात मोठी संधी

कृषी आणि फलोत्पादन अभ्यासक्रमात अंतर्गत 33 प्रशिक्षित तरुणांना प्रमाणपत्र प्रधान
Ravi Naik on proposed Ponda District
Ravi Naik on proposed Ponda DistrictDainik Gomantak

राज्यात प्रथमच कृषी विभागाने युवकांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 60 युवकांनी सहभाग घेतला. तसेच आज कृषी आणि फलोत्पादन अभ्यासक्रमात अंतर्गत 33 प्रशिक्षित तरुणांना प्रमाणपत्र प्रधान करण्यात आली. यावेळी राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी माझा विभाग नफा कमावणारा नाही तर लोकांच्या फायद्यासाठी कार्य करणारा असल्याचे म्हटले आहे.

(my agriculture department is not profit making department it gives people different schemes said minister Ravi naik)

Ravi Naik on proposed Ponda District
GCZMA: हॉटेल 'कांदोळी'ला 2.04 कोटी नुकसानभरपाईचा आदेश कायम

यावेळी मंत्री नाईक म्हणाले की, राज्यात अनेक युवक युवती चांगले शिकले आहेत. मात्र त्यांना स्वत: ला आजमावण्यासाठी एखाद्या क्षेत्रात भरीव काम करणे आवश्यक असुन त्यासाठी कृषी हा चांगला पर्याय आहे. त्यामूळे राज्यातील युवक युवतींनी याचा विचार करुन या अभ्यासक्रमाचा फायदा घ्यावा, आणि राज्यातील कृषी क्षेत्रात नव नवे प्रयोग करावेत असे ते यावेळी म्हणाले.

Ravi Naik on proposed Ponda District
CM Appeal: पर्यटक, नागरिकांनी प्लास्टिक बाटल्या व कचरा रस्त्यांवर टाकू नये - मुख्यमंत्री सावंत

कृषी विभाग तरुणांसाठी शेती कशी करावी याचे प्रशिक्षण देतो - कृषी संचालक

प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान बोलताना कृषी संचालक नेव्हिल अल्फान्सो म्हणाले की, आमचा कृषी विभाग हा शेतकर्‍यांसाठी विशेषत: तरुणांसाठी शेती कशी करावी याचे प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवत आहे. यामध्ये आम्ही विविध प्रकारची शेती कशी करावी, कीटकनाशके वापरण्याचे ज्ञान, मशरूम लागवड, शेळीपालन, कुक्कुटपालन इ. याबद्दल कौशल्य प्रदान केली आहेत. त्यामूळे ही कौशल्य शेती करताना उपयोगी ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com