Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपावर तीन ठिकाणांहून 'लँडिंग'

Mopa Airport: मोपा विमानतळ प्रकल्प उभारणाऱ्या 'जीएमआर' कंपनीचे दिल्ली, हैद्राबाद अन् बंगळूर असे तीन विमानतळ आहेत.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: मोपा विमानतळ प्रकल्प उभारणाऱ्या ‘जीएमआर’ कंपनीचे दिल्ली, हैद्राबाद आणि बंगळूर असे तीन विमानतळ आहेत. या तिन्ही विमानतळांवरून गोव्याकडे येणारी विमाने 14 डिसेंबरपासून दक्षिण गोव्यातील दाबोळी विमातळावर न उतरता ‘मोपा’वर उतरणार आहेत. तसेच अजून 17 नवे मार्ग ‘मोपा’कडे वळविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडे स्वत:चे आणि विकसित करण्यासाठी घेतलेले असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून 21 विमानतळ आहेत. या विमानतळांवरून गोव्याकडे येणारी सर्व विमाने ही भविष्यात मोपावर उतरवली जातील. सुरवातीला दिल्ली, हैद्राबाद आणि बंगळूर या तीन ठिकाणची विमाने मोपाच्या दिशेने वळविण्याचे निश्‍चित झाले आहे.

सर्व विमान कंपन्यांना या नव्या बदलाची कल्पना देण्यात आली असून इंडिगोसह इतर कंपन्यांची सहमती असेल, असेही एका अधिकाऱ्याने ‘गोमन्तक’ला सांगितले. ‘सकाळी 8 ते 11 या तीन तासांत ‘दाबोळी’वर एकही नागरी विमान उतरवू किंवा उड्डाण घेऊ शकत नाही. या तीन तासांसाठी विमान वाहतूक ‘मोपा’ला होणार व 23 विमाने उतरली जाणार असल्याने नवे 17 मार्ग ठरविण्यात आले आहेत.

यामध्ये दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता, नागपूर, लखनऊ, चंदिगढ, अहमदाबाद या विमानतळांचा समावेश आहे’, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

ओमानचा निर्णय

जीएमआर कंपनीकडे ओमान, ग्रीसमधील हेराकलीओन व फिलिपिन्समधील मेकटन विमानतळ आहेत. रशियातील एक विमानतळ दुरुस्तीसाठी घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ओमानने आपले विमान ‘मोपा’ला लॅंडिंग करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. तेथे तिकीट बुकिंगवेळी विमान मोपाला उतरवणार याची कल्पना दिली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

गोव्याच्या पर्यटनात भर-

भारताची राजधानी दिल्ली हे शहर अत्यंत महत्त्वाचे असून ‘मोपा’ यापुढे थेट या शहराशी जोडले जाणार आहे. तर ‘आयटी’ची राजधानी म्हणून बंगळूरकडे पाहिले जाते. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या हंगामात गोव्याला येण्यासाठी विमानसेवेची मागणी वाढते. अशावेळी हे विमानतळ ‘मोपा’ला जोडले गेल्यावर दळणवळणात अधिक भर पडेल. तसेच गोव्याच्या पर्यटनासाठी ते पोषक ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT