Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: राज्यात धुव्वाधार! मये-कालवी रेल्वे क्रॉसिंग मार्ग पाण्याखाली, पडझडीच्या घटना सुरूच

केपे मडगाव रस्त्यावरून होणारी वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली

Ganeshprasad Gogate

Goa Monsoon 2023 गणेश चतुर्थी दरम्यान सुरु झालेल्या पावसाने गोव्यात बऱ्यापैकी बॅटिंग सुरु ठेवली. हवामान खात्यातर्फे मागील तीन दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता तर आज म्हणजेच शनिवारी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

कुशावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पारोडा पुलावरून पाणी वाहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तर उत्तर गोव्यातील मये-कालवी हा रेल्वे क्रॉसिंग मार्ग देखील पाण्याखाली गेला आहे. तर केपे मडगाव रस्त्यावर पाणी आल्याने सदर रस्त्यावरून होणारी वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली आहे.

पावसासह वादळीवारा देखील वाहत असल्याने राज्यात पडझडीच्या घटना घडत आहेत.पणजी लगतच्या मिरामार-दोनपावला रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.

तर बार्देश तालुक्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून एका ठिकाणी घरे आणि गाड्यांवर झाडे कोसळून सुमारे 4.20 लाखांचे नुकसान झाले.

तसेच शनिवारी सकाळी वास्को-सडा येथे दरड कोसळून लगतच्या घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

तसेच काल म्हणजेच शुक्रवारी रात्रौच्या सुमारास म्हापसा करसवाडा येथेही दरड कोसळल्याची घटना घडली होती. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT