Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: ऐन आषाढात पाऊस रेंगाळला; शेतकऱ्यांच्या नजरा नभाला! पेरणी खोळंबली

खरिपाबरोबर रब्बीवरही परिणाम होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update: राज्यात मॉन्सून दाखल झाला असला, तरी त्याने दडी मारली आहे. त्यामुळे कधी पाऊस पडणार याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. लांबलेल्या पावसामुळे राज्यातील तब्बल ३१ हजार ६५० हेक्टर शेती क्षेत्रातील पेरणी लांबली आहे. यात भात आणि भाजीपाल्यांचा समावेश आहे.

या लांबलेल्या पावसाचा खरिपाबरोबर रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी शेतीचे नियोजन बिघडणार की काय याची धास्ती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मॉन्सून विस्कळीत झाला. याबरोबरच प्रशांत महासागरातील अल निनो सक्रिय असल्याने त्याचा विपरीत परिणाम मॉन्सूनच्या वाटचालीवर होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मॉन्सून महाराष्ट्राच्या कोकणपट्ट्यात अडकून आहे. पुढील चार दिवस मॉन्सून कमजोर असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

२३ जूननंतर मुसळधार पाऊस शक्य

राज्यात उद्या बुधवारी मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. २३ नंतर राज्यात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात केवळ ०.९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत पणजी, जुने गोवे, दाबोळी, मडगाव, सांगे आदी भागात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

दक्षिण गोव्यात जास्त उत्पादन

खरीप हंगामात दक्षिण गोव्यात १० हजार ५५४ हेक्टरवर भात शेती होते, तर दक्षिण गोव्यात १२ हजार ७३४ हेक्टरवर भात शेतीचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय दक्षिण गोव्यातच भाजीपाल्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. यात फोंडा, सांगे, धारबांदोडा, काणकोण, केपे आणि सासष्टीचा समावेश आहे.

केंद्रीय पथक पाहणी करणार

नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटेचा फटका बसलेल्या राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आवश्‍यक त्या उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने पाच तज्ज्ञांचे पथक पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली उष्णतेच्या लाटेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT