Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: गोव्यात पुढील पाच दिवस 'मुसळधार', दिवसभर राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

राज्यात आज दिवसभरात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वारे आणि पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update: गोव्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार पावासाचा इशारा गोवा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यात जोरदार सरी बरसतील त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा खात्याने दिला आहे.

राज्यात आज दिवसभरात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वारे आणि पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाली.

गोवा हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, 23 ते 25 जून या काळात गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. याकाळात 40 ते 45 कि.मी प्रतितास वेगाने वारे वाहतील, महाराष्ट्र किनारपट्टी आणि गोव्यात याचा प्रभाव जाणवेल. याकाळात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले शिवाय अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड होऊन घरांचे नुकसान झाले.

गुरूवारी दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. यामुळे विविध पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि झाडे उन्मळून पडणे यासारख्या घटना घडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT