Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Yellow Alert: धुवांधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा! गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'

Goa Monsoon Heavy Rain Forecast: गोव्यात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली असून राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडत आहे.

Manish Jadhav

पणजी: गोव्यात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली असून राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर, गोवा वेधशाळेने पुढील पाच दिवस राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. तसेच, सर्वसामान्य नागरिकांनीही पावसाच्या या काळात स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

मागील 24 तासांतील आकडेवारीनुसार, राज्यात सरासरी 2.20 इंच इतक्या पावसाची नोंद झाली. यामध्ये प्रामुख्याने धारबांदोडा, राजधानी पणजी आणि जुने गोवा या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा उशिराने हजेरी लावल्यामुळे गोव्यातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे ढग जमा झाले होते. पावसाअभावी अनेक भागांतील शेतीची कामे आणि पेरण्या पूर्णपणे रखडल्या होत्या, तर दुसरीकडे प्रमुख जलस्रोतांमधील पाणीसाठा आटल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते.

मात्र, आता सुरु झालेल्या या दमदार पावसामुळे (Rain) रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल आणि जलसाठ्यातही मोठी वाढ होईल, ज्यामुळे बळीराजासह संपूर्ण गोमंतकीयांना मोठा दिलासा मिळाला. आगामी पाच दिवस पाऊस असाच सक्रिय राहणार असल्याने निसर्गाचे रुप पालटणार असले, तरी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT