Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update 2023: मुसळधार पावसामुळे पडझडीचे सत्र सुरूच! कोठंबीमध्ये गोठ्यावर कोसळले वडाचे झाड

राज्यभरात पावसाने अक्षरश: धुमशान घातले असून ठिकठिकाणी पडझड होण्याच्या घटना सुरूच आहेत

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update 2023: राज्यभरात पावसाने अक्षरश: धुमशान घातले असून ठिकठिकाणी पडझड होण्याच्या घटना सुरूच आहेत. मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांना अतिशय सांभाळून राहावे लागत आहेत.

पावसामुळे कोठंबीमध्ये वडाचे झाड झाड कोसळल्याची घटना घडली आहे.

माहितीनुसार, रात्रभर सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे कोठंबीमध्ये वडाचे झाड शेजारीच असलेल्या गाईच्या गोठ्यावर कोसळले. यामुळे गोठ्याच्या शेडचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही

दरम्यान, या पडझडीच्या घटनांमध्ये खासकरून वीज खात्याचे मोठे नुकसान झाले. राज्यात रविवारी अग्निशमन आणि आपत्ती नियंत्रण कक्षाला एकूण ६७ कॉल्स आले.

त्यापैकी ६५ कॉल्स पडझडीशी संबंधित होते. एका दुर्घटनेत एकाला वाचवण्यात जवानांना यश आले. अन्य दोन गंभीर घटनांमध्येही दलाने मदतकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT