Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update 2023: गोव्यात पुन्हा बरसू लागल्या पावसाच्या सरी! गोवेकर सुखावले

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गोव्यात पाऊस आपल्या मूळ अवतरात परतला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update 2023: अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गोव्यात पाऊस आपल्या मूळ अवतरात परतला आहे. हिंद महासागरातील द्विध्रुवामुळे राज्यातील मॉन्सून पुन्हा एकदा पुनरुज्जीवीत झाला आहे. गुरुवार आणि शुक्रवारी जोरदार पावसाने राज्यभरात हजेरी लावली.

शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळी उशिरापर्यंत पाहायला मिळाला. हवामानशास्त्रज्ञ आणि निवृत्त एनआयओ शास्त्रज्ञ, एम आर रमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागर द्विध्रुव ही हिंद महासागरातील अशी एक गोष्ट आहे जिचे दोन टप्पे आहेत, एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक.

हिंद महासागर द्विध्रुवाचा सकारात्मक टप्पा भारतीय उपखंडातील पर्जन्यवृष्टीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.

अरबी समुद्र आणि भारतीय उपखंडाच्या मध्य भागात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे तसेच ऑफ शोर टर्फस्‌ यामुळे राज्यात तब्बल 22 दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.

हवामान खात्याच्‍या अंदाजानुसार आजपर्यंत (26 ऑगस्ट) राज्यात काही ठिकाणी तुरळक व मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्क राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT