Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पावसाचा ब्रेक संपणार! राज्यात पुन्हा बरसणार जोरदार सरी

गोव्यात मागील काही दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update 2023: यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली मात्र त्याचे रौद्र रूप पाहायला मिळाले. गोव्यात मागील काही दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये गोव्यात सर्वाधिक पाऊस पडला. यावेळी 1836.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या मोसमातील आतापर्यंतचा सर्वाधिक 24 तासांमधील पाऊस 152.5 मिमी २८ जूनला नोंदवला गेला. जुलैमध्ये सर्वाधिक 131.2 मिमी पावसाची 6 जुलैला नोंद झाली. मागील 15 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे.

जुलैमधील पावसाने 26.8% अतिरिक्त प्रमाणात पडलेला पाऊस आता10.2% पर्यंत कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सून प्रमाण कमी असल्याने IMD तर्फे सर्वाधिक पाऊस म्हणून फक्त 7.8 मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. मात्र अजून आठवड्याभरात पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

शंभरी पार!

राज्यात 22 जूनपर्यंत गायब झालेल्या पावसाने पुढील 34-35 दिवसांत धमाल उडविली. त्यापैकी 27 दिवसांत पडलेल्या अतिरिक्त पावसाने यंदा इंचाची शंभरीही लवकरच गाठली.

गेला आठवडाभर पावसाने उसंत घेतली असली, तरी हलक्या आणि मध्यम स्वरूपात पडणाऱ्या सरींनी आज अखेर 100.10 इंचाची नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT