budget trip to Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Trip: तुमच्या आवडत्या व्यक्तीसह गोव्याला पावसाळ्यात भेट द्या! गर्दी नाही, खर्च कमी, निसर्गाचा मनसोक्त अनुभव मिळवा

Goa off-season travel: पावसाळा सुरु होताच, या किनारपट्टीचं एक सुंदर रूप पाहायला मिळतं

Akshata Chhatre

पणजी: तुमच्या डोळ्यासमोर गोव्याची प्रतिमा म्हणजे चमचमणारे समुद्रकिनारे, हँगिंग शॅक्स, कॉकटेल आणि निळंशार आकाश अशीच असेल ना? ही गोव्याची 'क्लासिक' ओळख असली तरी, गोवा याहून वेगळा आहे. गोवा म्हणजे केवळ किनारे आणि पार्ट्या नाहीत. पावसाळा सुरु होताच, या किनारपट्टीचं एक सुंदर रूप पाहायला मिळतं. घनदाट हिरवीगार बाजू, समृद्ध संस्कृती, गजबजलेली स्थानिक बाजारपेठ आणि आत्म्याला तृप्त करणारं जेवण असा हा वेगळा गोवा आहे. पावसाळ्यातील गोवा खरोखरच शांत, अधिक हिरवागार आणि ताजेपणा देणारा असतो.

पावसाळ्यातील गोवा अनुभवण्याची अनोखी वेळ

पावसाळा साधारणपणे जूनच्या सुरुवातीला गोव्यात दाखल होतो आणि सप्टेंबर अखेरपर्यंत टिकतो. मात्र यावेळी गोव्यात पाऊस जरा लवकरच दाखल झालाय. या काळात भातशेतीला सुरुवात होते, धबधबे पूर्ण ताकदीने कोसळतात आणि लाल मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या काळात गोव्यात गर्दी कमी होते, वेग मंदावतो आणि निसर्ग संपूर्ण लक्ष वेधून घेतो.

पावसाळ्यातील गोव्यातील प्रमुख स्थळे कोणती?

चोर्ला घाट: पश्चिम घाटातील हा धुक्याचा डोंगरमार्ग गोव्याला कर्नाटकाशी जोडतो. नयनरम्य प्रवास आणि ताजी डोंगरावरील हवा, जोडप्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. इथली थंडगार झुळूक, ढग आणि घनदाट जंगलातील पायवाटा मनाला भुरळ घालतात.

'वाइल्डर्नेस्ट' आणि 'नेचर्स नेस्ट' सारखी रिसॉर्ट्स झाडांवरील मुक्काम, विस्तीर्ण दऱ्यांची दृश्ये आणि वेलनेस रिट्रीट देतात, त्यामुळे नवविवाहित जोडप्यांसाठी किंवा निसर्गात रमू इच्छिणाऱ्यांसाठी हे आदर्श ठिकाण आहे.

दिवार बेट: जुन्या गोव्यापासून अगदी थोड्या फेरीच्या अंतरावर असलेले दिवार बेट काळाच्या पडद्यामागे थांबल्यासारखे वाटतं. इथली ऐतिहासिक घरं, शांत गल्ल्या, हिरवीगार शेती आणि स्थानिक आदरातिथ्य हे ऑफबीट ठिकाण शोधणाऱ्या जोडप्यांसाठी उत्तम आहे. नयनरम्य शेतात सायकल चालवा, मांडवी नदीवर सूर्यास्ताचा आनंद घ्या किंवा गावातील अस्सल जीवनाचा अनुभव घेण्यासाठी हेरिटेज होमस्टेमध्ये राहण्याचे पर्याय उपलब्ध असतात.

तांबडी सुर्ला धबधबा: १२ व्या शतकातील तांबडी सुर्ला महादेव मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेला हा लपलेला धबधबा गोव्यातील शांत ठिकाणांपैकी एक आहे. घनदाट झाडी आणि हिरवळ यांनी वेढलेला हा धबधबा इतिहास आणि निसर्गाचे मिश्रण आहे. शांत पावसाळी दिवसाच्या प्रवासासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

नेत्रावळी धबधबा: मडगावपासून सुमारे ५० किमी अंतरावर नेत्रावळी वन्यजीव अभयारण्यात लपलेला हा धबधबा जंगलातून ट्रेक केल्यानंतर पाहायला मिळतो. त्याचा पडद्यासारखा प्रवाह छायाचित्रण, पक्षीनिरीक्षण आणि शांत निसर्ग भ्रमंतीसाठी योग्य आहे. अभयारण्याची समृद्ध जैवविविधता प्रत्येक भेटीला एक आरोग्यदायी इको-टूरिझमचा अनुभव देते.

पावसाळी ट्रेल्स आणि ड्राईव्ह्ज: धुक्याने भरलेल्या काणकोणमधून गाडी चालवा, चोडण बेटावरील मसाल्यांच्या मळ्यांमध्ये सायकल फिरवा किंवा मांडवी नदीत क्रूझचा आनंद घ्या. रस्ते निसरडे असू शकतात, त्यामुळे बाईक चालकांनी सावकाश प्रवास करावा. मात्र, कमी गर्दी आणि नयनरम्य दृश्यांमुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो.

गोवा पर्यटन विभाग धबधबे आणि प्राचीन मंदिरांपर्यंत हंगामी ट्रेक आयोजित करतो, ज्यात इको-टूरिझम आणि गोव्याची जंगले व आदिवासी जमातींबद्दल माहिती मिळते. तुम्ही गोव्याला फिरायला जायचा विचार कराल, तेव्हा फक्त समुद्रकिनारेच नव्हे, तर पावसाळ्यातील या हिरव्यागार आणि शांत गोव्याचाही विचार नक्कीच करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT