Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: श्रीलंका, व्हिएतनाममध्ये स्वस्त दरात चांगल्या सुविधा; गोवा पर्यटन मंत्र्यांचे वाढले टेन्शन, मान्सून पर्यटन वाढविण्यासाठी करणार प्रयत्न

Rohan Khaunte: पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन हंगामाच्या (ऑफ-सीझन) कालावधीत गोव्याच्या प्रतिमेला नव्याने आकार देण्याचे आवाहन केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: पावसाळी हंगामात आशियातील अनेक देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर स्पर्धेचा दबाव निर्माण झाला आहे.

अशा पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन हंगामाच्या (ऑफ-सीझन) कालावधीत गोव्याच्या प्रतिमेला नव्याने आकार देण्याचे आवाहन केले आहे.

अलीकडेच ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा, हॉटेल व्यावसायिक आणि विमान सेवा प्रतिनिधींसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत मंत्री खंवटे यांनी श्रीलंका, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या आंतरराष्ट्रीय पर्यायांच्या स्पर्धेबद्दल चिंता व्यक्त केली.

या देशांमध्ये स्वस्त दरात चांगल्या सुविधा मिळत आहेत. त्यामुळे गोव्याने पर्यटकांना अधिक काळ येथे राहण्यासाठी कसे आकर्षित करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे, असे मत खंवटे यांनी व्यक्त केले.

त्यांनी यासोबतच पर्यटकांच्या खर्चाची क्षमता लक्षात घेऊन गोव्याने आपल्या सेवा आणि संकल्पना नव्याने मांडण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT