Vijai Sardesai and Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: विरोधकांमधील फूट पुन्हा उघड! 'त्या' बैठकीवरुन सरदेसाईंचे युरींवर टीकास्त्र

Goa Assembly Monsoon Session 2025: गोव्यात आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे.

Manish Jadhav

पणजी: गोव्यात आगामी विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला असला तरी, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बोलावलेल्या बैठकीवरुनच आता मतभेद समोर येत आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी युरी आलेमाव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "प्रश्नोत्तराची सगळी प्रक्रिया झाल्यानंतर विरोधी आमदारांची बैठक बोलावून काय फायदा?" असा सवाल उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी येत्या मंगळवारी (18 जुलै) सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बैठकीच्या वेळेवरच सरदेसाई यांनी आक्षेप घेतला आहे.

सरदेसाई म्हणाले की, विधानसभेच्या कामकाजातील प्रश्नोत्तराचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरकारला उत्तरे द्यावी लागतात आणि त्यातून अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे समोर येतात. प्रश्नोत्तराची प्रक्रिया ही अधिवेशनाच्या सुरुवातीलाच होते. "सगळे प्रश्न विचारुन झाल्यानंतर त्यावरील चर्चा संपल्यानंतर बैठक बोलावून काय उपयोग? तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ कधी मिळाला?" असा रोखठोक सवाल सरदेसाई यांनी केला.

दुसरीकडे, या बैठकीला उपस्थित राहण्याबाबतही विजय सरदेसाई यांनी अनिश्चितता व्यक्त केली आहे. "या बैठकीतून काय निष्पन्न होईल, याबाबत मला शंका आहे. जर तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला नाही, तर बैठकीचा उद्देश कसा साध्य होईल?" असे मत त्यांनी व्यक्त केले.

आता युरी आलेमाव यांनी बोलावलेल्या या बैठकीला अन्य विरोधी पक्षांचे आमदार उपस्थित राहतात का आणि या टीकेवर आलेमाव काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षांमध्ये उफाळलेले हे मतभेद सत्ताधाऱ्यांसाठी पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गंगापूजन उत्साहात..!

Marathi Schools Goa: सरकारी मराठी शाळा बंद पाडण्यासाठी पालक नव्‍हे, सरकार जबाबदार नाही का? वेलिंगकरांचा सवाल

IIT Project Goa: 'आयआयटी' कुठे सुरू होणार? CM सावंतांनी टाळले उत्तर; विद्यार्थ्यांना दिला 'नोकरी देणारे व्हा'चा सल्ला

Samosa Jalebi: समोसा, जलेबी सिगारेट एवढेच घातक; 'Injurious to health' चा इशारा फलक लावला जाणार

Saina Nehwal Separation: आणखी एक स्पोट्स स्टार कपल झाले वेगळे; सायना नेहवाल पारुपल्ली कश्यप लग्नाच्या सात वर्षानंतर विभक्त

SCROLL FOR NEXT