Goa Monsoon Red Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Red Alert: राज्यात आज अतिवृष्टीची शक्यता; सावधानतेची सूचना

मंगळवारी पणजी झाली जलमय; पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्टचे संकेत

दैनिक गोमन्तक

Goa Wheather Monsoon Red Alert: मध्य अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवार, १९ जुलै रोजी गोव्यासह महाराष्ट्र, तसेच कर्नाटकातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच पुढील दोन दिवस २० आणि २१ रोजीही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेले दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आता नव्याने जोर धरला असून राज्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मधूनच येणाऱ्या जोरदार सरींमुळे जनजीवनावर परिणाम होत होता.

मात्र, उद्या बुधवारी अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

गेल्या २४ तासांत एकूण ४२.५ मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत राज्यात एकूण १,६९३.६ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ६९ मिमी. पाऊस साखळी येथे पडला.

वाहतूक मंदावली

राजधानी पणजीत मंगळवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने शहरातील अनेक भागांत पाणी साचले.

पणजी बसस्थानक रस्ता, तसेच मांडवी पुलावर पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत कसरत करावी लागली. सांत इनेज, मळा, पर्वरी परिसरातही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

धरण साठ्यांत कमालीची वाढ

राज्यातील धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गावणे धरणात सर्वाधिक ८९.९ टक्के पाणी साचले आहे, तर गेल्या महिन्यात कोरडे पडलेल्या पंचवाडी धरणात ८८.८ टक्के पाणी साचले असून त्या खालोखाल साळावली धरणात ८७.८, आमठाणे ८१.३, चापोली ७२.२, तर सर्वांत कमी अंजुणे धरणात २८.५ टक्के पाणी आहे. येत्या काही दिवसांत ही धरणे भरण्याची शक्यता अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT