Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोव्यात 3 दिवस 'ऑरेंज अलर्ट', वाऱ्यांचा वेग वाढण्‍याची शक्‍यता; हवामान खात्याकडून खबरदारीचं आवाहन

Goa Weather Update: राज्यात सध्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गोव्यातील विविध भागांत संततधार सुरू आहे. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात सध्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गोव्यातील विविध भागांत संततधार सुरू आहे. दरम्यान, हवामान खात्याने गोव्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा देत १५, १६ आणि १७ जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे काही भागांत रस्ते जलमय झाले आहेत तर काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक राहू शकतो, त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन गोवा वेधशाळेने केले आहे.

नागरिकांसाठी सूचना:

  • गरज नसल्यास घराबाहेर पडू नका.

  • विजांच्या गडगडाटाच्या वेळी झाडांखाली उभं राहू नका.

  • ओले रस्ते आणि साचलेल्या पाण्यामुळे अपघाताचा धोका संभवतो, त्यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT