Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: शिवोलीत पर्यटकांच्या कारवर कोसळले आंब्याचे झाड, दिल्लीला परतत असताना घडली दुर्घटना

झाडालगतचे विजेचे तीन खांब उन्मळून पडल्याने या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे

Ganeshprasad Gogate

Goa Accident सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून दरड कोसळण्याच्या आणि पडझडीच्या घटना घडत आहेत.

रविवारी एका चारचाकीवर भलेमोठे आंब्याचे झाड कोसळल्याची घटना शिवोली येथील क्षेत्रपाल मंदिरानजीक घडली. GA06 T 6990 नोंदणी क्रमांक असलेल्या Ertiga गाडीवर रस्त्यालगतचे आंब्याचे भले मोठे झाड पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले. याव्यतिरिक्त झाडालगतचे विजेचे तीन खांब उन्मळून पडल्याने या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

या कार मधून काही पर्यटक प्रवास करत होते. गोवा पर्यटन करून ते दिल्लीला परतत असताना ही घटना घडली. वाहनात असलेल्या व्यक्तींविषयी पुढील माहिती उपलब्ध झालीय.

गोवा पासिंगची ही एर्टिगा गाडी लक्षवीर सिंग (वय ४० वर्षे) हे चालवत असून त्यांच्या सोबत पत्नी: प्रिया सिंग (वय 36 वर्षे), मुलगी: मीरा सिंग (वय 5 वर्षे), बहीण: रितू धैया (वय 34 वर्षे), भाची: समायरा धैय्या (4 महिन्यांची) असे मिळून 5 जण प्रवास करत होते.

Goa Accident

सदर पर्यटक फॉर्च्युन कासा बिल्डिंगमध्ये राहत असून आज ते दिल्लीला जाण्यासाठी विमानतळाकडे जात होते. प्रवासादरम्यान 100 वर्षांहून अधिक जुने असलेले आंब्याचे झाड उन्मळून त्यांच्या कारवर पडले. त्यांच्यापैकी दोन अल्पवयीन जखमी झाले असून रितू धैया ही 34 वर्षीय महिला किरकोळ जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने फांद्या तोडण्यास सुरुवात केली. आॅक्सेलचे सरपंच प्रवीण कोचरेकर यांच्यासह उपसरपंच रेशल हरमलकर आदींनीही घटनास्थळी धाव घेतली.

झाड वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज वाहिन्यांतुटून शिवोलीमधील फॉर्च्यून कासा इमारतीमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

रविवारी धारगळ येथे दरड कोसळाळुन माती मुंबई-गोवा महामार्गावर आल्याची घटना घडली आहे. राज्यात पावसाची संततधार सुरु असून सखल भागात पाणी साचले असून अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT