Tree fell on car Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: पावसामुळे पडझडीच्या घटनांत वाढ; बागा येथे कारसहित दुचाकीवर झाड कोसळले

नाझरी रिसॉर्ट पार्किंगजवळ घडली घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023 राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली असून राज्यात बहुतांश भागात पडझडीच्या घटना सुरु आहेत. कळंगुट येथील नाझरी रिसॉर्ट पार्किंगजवळ हुंदाई कार (i20) (गाडी नंबर GA - 03 W 7752) आणि बजाज पल्सर बाईकवर (गाडी नंबर GA - 03 S 9342) झाड पडल्याची घटना घडली असून यात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानीसारखा अनर्थ घडला नाही. सदरची घटना दुपारी 12 च्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या दोन्ही गाड्यांवर पडलेले भले मोठे झाड कापून बाजूला केले. या घटनेत सुमारे 1 लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान पावसामुळे राज्यभरात पडझड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठिकठिकणी रस्त्यावर झाडे कोसळत असल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

गोव्यात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. साखळीत वाळवंटी नदी तुडूंब भरून वाहत असून सर्व सखल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली असूनपूरसदृष्य स्थिती उद्‍भवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT