Goa Monsoon 2023 Red Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Red Alert: पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा; नियंत्रण कक्षांशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी

जनतेला आपत्कालीन परिस्थितीत, पाणी साचलेल्या तसेच पूरप्रवण भागात न जाण्याचा सल्लाही देण्यात आलाय.

Ganeshprasad Gogate

Goa Red Alert गोव्यात पावसाळी हंगामाच्या अखेरच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये चतुर्थीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून मागील तीन दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.

आज शनिवारी मुसळधार पाऊस पडत असून गोव्यात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलाय. तसेच जनतेला आपत्कालीन परिस्थितीत, पाणी साचलेल्या तसेच पूरप्रवण भागात न जाण्याचा सल्लाही देण्यात आलाय.

खबरदारीचा उपाय म्हणून गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नियंत्रण कक्षांशी संपर्क साधण्यासाठी राज्य- 08322419550, उत्तर गोव्यासाठी- 08322225383, दक्षिण गोव्यासाठी 08322794100 हे हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत.

शुक्रवारी सकाळपासून संततधार सुरु असून पावसाने राज्याला अक्षरशः झोडपून काढले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील ऑफ शोर ट्रफ्स यांमुळे नैऋत्य मॉन्सून परतीच्या पावसाने आज राज्याला झोडपले. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या 24 तासांत सप्टेंबर महिन्यातील विक्रमी 80.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

शुक्रवारी जोरदार पावसामुळे राजधानी पणजीतील रस्ते पाण्याखाली गेले. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे दृश्‍यमानता कमी झाल्याने दुचाकी तसेच चारचाकी चालकांना वाहने सावकाश चालवावी लागत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

बाजारात नाताळची धूम! ख्रिसमस ट्री, सजावट साहित्याची खरेदी जोरात; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर

ED Raid Goa: जमीन हडप प्रकरण: 'मॉडेल्स' कंपनीवर ईडीचे छापे, दुबईतील मालमत्तेचे पुरावे जप्त

Jasprit Bumrah Angry: बुमराहचा पारा चढला! चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि फेकून दिला Watch Video

Rooftop Solar: राज्यातील 798 ग्राहकांना शून्‍य रुपये वीज बिल; 1,304 घरांच्‍या छतांवर 'रुफ टॉप सोलर'

SCROLL FOR NEXT