Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: पणजीसह राज्याला झोडपले

24 तासांत 31.7 मि.मी.पाऊस : चतुर्थीच्या आनंदावर विरजण

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023 मागील काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस चतुर्थीच्या काळात सक्रिय झाल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. हवामान खात्याने आज (शुक्रवारी) आकाश निरभ्र राहील, असा अंदाज वर्तविला होता;

परंतु हा अंदाज फोल ठरवत सायंकाळी पावसाने पुन्हा जोरात सुरवात केली. मागील २४ तासांत राज्यात एकूण ३१.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून एकूण ३०४६ मि.मी म्हणजेच ११९.९२ इंच पावसाची नोंद झाली आहे.

गुरुवारी सकाळपासून दाणादाण उडविणाऱ्या पावसाने रात्री ११ च्या सुमारास विश्रांती घेतली. आज सकाळपासून आकाश मोकळे होते.

त्यामुळे लोक नातेवाईक, मित्रांच्या घरी श्रींच्या दर्शनाला निघाले. मात्र, दुपारी पुन्हा घरी परतायच्या वेळी पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले.

मागील काही दिवस राज्यात वाढलेल्या उष्म्याने जनता हैराण झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला आहे.

बळीराजा सुखावला!

राज्यात मागील महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नव्हता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. वरुण राजाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या.

या आठवड्यात योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही तर पिकांवर संकट ओढविण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली होती. हा पाऊस शेतीसाठी, खासकरून भात शेतीस पोषक असल्याने शेतकऱ्यांसाठी चतुर्थी सण सुखवार्ता देणारा ठरणार आहे.

आज गाठणार 120 इंचांचा पल्ला

शनिवारी पाऊस १२० इंचांचा आकडा पार करणार आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक ९२.८ मि.मी. म्हणजेच ३.६५ इंच पाऊस पणजीत पडला. त्या खालोखाल जुने गोवे - ५६.२ मि.मी., मुरगाव ४०.५ मि.मी, म्हापसा ३१ मि.मी., साखळी १५.६ मि.मी. पेडणे १२.८ मि.मी. तर काणकोण येथे ८.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत ३.७ टक्के अधिक पाऊस पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT