Goa Monsoon: पुढील चार दिवस राज्यात यलो अलर्ट
Goa Rain Beach Waves canava
गोवा

Goa Weather Update: १० मीटरहून अधिक उंचीच्या लाटा; २४ तासांत ३ इंच पाऊस

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्राद्वारे राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी ३ मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ-मोठ्या लाटा उसळल्याचे आढळून आले. शिरदोन येथे दहा मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळल्या.

राज्यात मागील दोन दिवस जोरदार बरसणाऱ्या पावसाचा वेग आज मंदावला, परंतु मागील २४ तासांत राज्यात एकूण ३.०५ इंच पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण ८८५.७ मि.मी. म्हणजेच ३४.८७ इंच पावसाची नोंद करण्यात आली.

पुढील चार दिवस राज्यात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला असून राज्यात मध्यमस्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, आज सकाळपासून पावसाचा जोर होता, पण दुपारपासून तो कमी झाला. किनारी भागात काही ठिकाणी रात्री उशिरा पावसाच्या सरी कोसळल्या. उद्या राज्यात अनेक ठिकाणी मध्यमस्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

म्हापशात सर्वाधिक ४ इंच पाऊस

मागील २४ तासांत राज्यात सर्वाधिक १०३ मि.मी. म्हणजेच ४.०५ इंच पावसाची नोंद म्हापसा येथे करण्यात आली. त्याखालोखाल मडगाव येथे १०२.६ मि.मी., केपे ९०.६ मि.मी., पेडणे ८०.४ मि.मी., वाळपई ७९.३ मि.मी., सांगे ७४.६ मि.मी., काणकोण ७४.२ मि.मी., फोंडा ७०.८ मि.मी., जुने गोवे ७० मि.मी., दाबोळी ६७.८ मि.मी., मुरगाव ६५.६ मि.मी., तर पणजी येथे ५९.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

Goa Top News: म्हादई पात्राची पाहणी, अपघात आणि मॉन्सून अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT