Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; मध्यंतरी गायब झालेल्या पावसाचं कारण शास्त्रज्ञांनी उलगडलं..

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update 2023 प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अल निनो स्थितीमुळे गेल्या १९ दिवसांपासून पावसाने राज्यात दडी मारली आहे. मात्र, मॉन्सूनची ही स्थिती भारतीय उपखंडाला त्रासदायक ठरली आहे.

यामुळे शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये केवळ ३० टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसेल, असा अंदाज कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हवामान क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश कुमार म्हणाले की, सध्या अल निनो सक्रिय आहे. साहजिकच याचा मॉन्सूनवर परिणाम होईल, असा अंदाज मॉन्सून आगमनापूर्वीच व्यक्त केला होता. त्यातच मॉन्सूनच्या तोंडावर अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने तो विस्कळीत झाला आणि पारंपरिकरित्या एक जूनला केरळमध्ये दाखल होणारा मॉन्सून ९-१० जूनला प्रत्यक्षात आला.

पुढे मॉन्सूनची सक्रियता आणि वाटचाल कायम राहिल्याने अवघ्या दोनच दिवसांत मॉन्सूनने राज्यात हजेरी लावली आणि दोन जुलैपर्यंत संपूर्ण देशभर मॉन्सून व्यापला. मात्र, २३ जूनपर्यंत पावसाने प्रत्यक्षात दांडी मारली.

पुढे बंगालच्या उपसागरात आणि मध्य भारतीय उपखंडात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आणि ऑफ शोर ट्रफ्समुळे पाऊस पुन्हा सक्रिय झाला आणि २३ जून ते २७ जुलैदरम्यान काही अपवाद वगळता बहुतांश दिवशी अतिरिक्त पाऊस पडला.

या ३० दिवसांत राज्यात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ८५ टक्के पाऊस पडला. त्यामुळे राज्यात पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाच्या पाण्याची समस्याही संपुष्टात आली आहे.

अर्थात, घाटमाथ्यावर पावसाची हजेरी नसल्याने यंदाचा खरीप आणि पुढे येणाऱ्या रब्बी हंगामावर विपरित परिणाम होईल आणि शेतमालाचे दर भडकतील, असा अंदाज कृषी उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

पुन्हा बरसणार...

सध्या राज्यासह इतर भागांत पावसाने दडी मारली असून येत्या आठवडाभरात बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे आणि उपखंडीय ऑफ शोर ट्रफ्समुळे आठवडाभरात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या पश्‍चिम विभागाचे प्रमुख आर. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.\

अतिरिक्त पाऊस

जुलैमधील अतिरिक्त पावसामुळे जादाचा पाऊस नोंदला गेला आहे. २४२७.९ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना २८ जुलैपासून पाऊस कमी प्रमाणात असला, तरी तो २५७८.९ मिमी. नोंदला गेला आहे. हा सरासरीपेक्षा ६.२ मिमी. जास्तीचा पाऊस आहे. अद्याप पावसाला दीड महिना बाकी आहे. त्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विसर्जन पार पडले तरी खड्डे दुरुस्ती नाहीच! स्वागत कमानीवर खर्च मात्र रस्ते..?

ISL 2024-25: '...तर पराभव निश्चित '; पहिल्या सामन्यापूर्वी एफसी गोवाच्या प्रशिक्षकांनी केले मोठे विधान

Goa Drugs Case: सापळा रचून कर्नाटकातील युवकाला गांजासह अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

Morjim Beach: मोरजी किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य! पर्यटन खाते स्वच्छता राखण्यात सपशेल अपयशी

Plastic Ban: ‘सिंगल यूज प्लास्टिक’ वापरणाऱ्यांना साखळीत दणका; जागृतीनंतर करणार दंडात्मक कारवाई

SCROLL FOR NEXT