Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: डिचोली परिसरातील पूरस्थिती नियंत्रणात, पण भीती कायम !

पाणी ओसरले ः पावसाचा जोर मंदावल्याने डिचोलीवासीयांना दिलासा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023 गेल्या आठ-दहा दिवसांपासून पासून धुमाकूळ घातलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता मंदावला आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज (गुरुवारी) पावसाची धार किंचित कमी झाल्याने, डिचोलीत निर्माण झालेली पूरसदृश्य स्थिती नियंत्रणात आली आहे.

काल दिवसभर तर पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. नद्यांची पातळी पुन्हा वाढून पाणी पात्राबाहेर पडले होते. भीती कायम असली तरी सध्या स्थिती नियंत्रणात आहे.

सखल भागात पाणी तुंबून जलमय स्थिती उद्‍भवली होती. कालच्या तुलनेत आज दुपारपासून सायंकाळपर्यंत पावसाचा जोर मंदावला होता. पावसाचा जोर मंदावल्याने नद्या ओसरू लागल्या असून, नद्यातील पाण्याची पातळी क्षमतेच्या खाली आली आहे. त्यामुळे जनतेनेही सुटकेचा श्वास घेतला आहे.

पावसाचा जोर मंदावला असला, तरी हवामान खात्याने ''रेड अलर्ट'' जारी केल्याने जनतेत भीती कायम आहे. दरम्यान, गेल्या आठ-दहा दिवसांच्या तुलनेत आज सायंकाळपर्यंत झाडांची मोठीशी पडझड झाली नाही.

अशी माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने डिचोलीसह विविध भागात घुसलेले पाणी हळूहळू ओसरत आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून कहर केलेल्या पावसाने कहर केला होता. कोसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात नदीनाले ओसंडून वाहू लागले होते. बहूतेक भागात जलमय चित्र दिसून येत होते. डिचोलीसह अन्य नद्यांनी धोक्याची पातळी पार केली होती. गेल्या शुक्रवारी मध्यरात्री तर नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने शहरातील बंदरवाडा आदी सखल भागात जलमय स्थिती निर्माण झाली होती.

वाठादेव, बागवाडा घरांमध्ये घुसले पाणी: काल तर पावसाने अक्षरशः रौद्रावतार धारण करून सर्वत्र धुमाकूळ घातला होता. ''कोसळधार''मुळे डिचोलीत हाहा:कार उडाला होता. वाठादेव, बागवाडा-पिळगाव आदी भागात काही घरांमध्ये पाणी घुसले होते. आज दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

Cash For Job: नोकरीसाठी पैसा दिला, तरी ‘इतका आला कुठून?’ असे विचारत ED मागे लागते; पैसे देऊन अवलक्षण

अग्रलेख: गोव्यात 'दरोडा' घालायचा विचार जरी मनात आला, तरी कापरे भरेल अशी जरब व भीती बसणे शक्य आहे..

IFFI 2025: 'जागतिक सिनेमा गोव्‍यात अनुभवता यावा, हेच आमचे प्रथम लक्ष्‍य’! NFDCचे तांत्रिक विभागप्रमुख यादव यांचे स्पष्टीकरण

Illegal Fishing: भाजप आमदाराच्या मालकीचा ट्रॉलर जप्त? महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी! अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT