Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोमंतकीयांनो सावधान! पुढील काही दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

Goa Weather Update: गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून पावसाने जोर पकडला आहे.

Sameer Amunekar

गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून पावसाने जोर पकडला आहे. हवामान खात्याने १ ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट जारी केला असून या काळात राज्यातील विविध भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत मध्य भारतातून पुढे गेला आहे. याचा थेट परिणाम गोवा, महाराष्ट्र, मध्य भारतासह किनारी भागांवर होत असून पुढील दोन ते तीन दिवस या प्रदेशांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने १ ऑक्टोबरपर्यंत राज्यासाठी यलो अलर्ट जारी करताना नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नद्या-ओढ्यांच्या काठावर, डोंगराळ भागात किंवा समुद्रकिनाऱ्यालगत जाणे टाळावे, कारण मुसळधार पावसामुळे पूरस्थिती किंवा भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, शुक्रवारी दुपारपासून गोव्यात ठिकठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात झाली होती. संध्याकाळी काही काळ पावसाची तीव्रता मंदावली असली तरी हवेत गारवा कायम होता. त्यामुळे तापमानात फारसा बदल जाणवत नसला तरी दमट हवामानाने नागरिकांना त्रास होत आहे.

पुढील काही दिवस नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT